Wednesday, May 27, 2026
Latest NewsLIFESTYLE

यकृताच्या कर्करोगावर ‘रसायू थेरपी’ची मात्रा

गुंतागुंत झालेल्या यकृताच्या कर्करोगावर आयुर्वेदातील रसायन थेरपीचा डोस रामबाण ठरत असल्याचे संशोधन पुण्यात करण्यात आले. या संशोधनातील निष्कर्ष ‘युरोपियन आणि जापनीज सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी’च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या सभेत सादर करण्यासाठी स्वीकारले गेले.
आधुनिक काळातील चुकीची जीवनशैली,तसेच  खाण्या-पिण्याच्या सवयीचा थेट परिणाम यकृतावर होतो. हिपॅटायटीस ‘बी’ आणि ‘सी’ सारखे विषाणूजन्य आजार  याचबरोबर दारू पिण्याने अथवा इतर कारणाने होणारा लिव्हर सिरॉसिस यामुळे यकृताच्या कार्यात बिघाड निर्माण होतो. या आजारांची चिकित्सा चालू असताना देखील या सर्व व्याधींचा उपद्रव स्वरूप यकृताचा कर्करोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. अशा यकृताच्या कॅन्सरच्या वयस्कर रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी आयुर्वेदातील रसायन चिकित्सेच्या माध्यमातून आशेचा नवा किरण दिसला असल्याचा विश्वास रसायू कॅन्सर क्लिनीकमधील आयुर्वेदिक वैद्यांनी जागतिक पातळीवर शास्त्रीय कसोटीवर सादर .

असे केले संशोधन
– यकृताचा कर्करोग चौथ्या टप्प्यात असलेल्या रुग्णांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली.
– केवळ रसायन थेरपी घेतलेले रुग्ण पहिल्या गटात, तर रसायन थेरपीसोबत प्रमाणित उपचार घेतलेल्या रुग्णांचे दुसऱ्या गटात वर्गीकरण केले.
– यकृताच्या कर्करोग झालेल्या यातील सर्व रुग्णांच्या आरोग्याची सर्वंकष माहिती संकलित करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित केलेल्या निकषांवर माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
– संशोधनात सहभागी रुग्णांना आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार औषधी वनस्पती व खनिजांवर जैविक प्रक्रिया करून उत्पादित रसायन औषधे देण्यात आली.
– औषधामुळे शारीरक्रीयेत आणि पेशीस्तरावर होणारे सूक्ष्मबदल टिपण्यात आले.

संशोधनाचा उद्देश काय?
प्रगत अवस्थेतील यकृताचा कॅन्सर झालेल्या रुग्णांवर सध्या उपलब्ध चिकित्सेत अनेक मर्यादा असल्याने आयुर्वेदीय दृष्टीने या रूग्णांकरिता काही नवीन उपचार पद्धती विकसित करता येऊ शकेल का जेणे करून या रुग्णांचे आयुष्यमान तर वाढेल तसेच यांच्या आयुष्याचा दर्जाही सुधारेल.
याकरिता रसायन थेरपीची यकृताच्या कॅन्सर झालेल्या प्रगत अवस्थेतील रुग्णांवरील परिणामकारकता अत्यंत शास्त्रीय पद्धतीने तपासणे, हा या संशोधनाचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या निकषांचा (FACT-G FACIT,FACCT आणि FAC IT) आधार घेण्यात आला.
निष्कर्ष :
– भूक मंदावणे, अन्न नकोसे वाटणे ,पोटात दुखणे ,
अशक्तपणा , कावीळ होणे इत्यादी या यकृताच्या कर्करुग्णांमधील प्रधान तक्रारी असतात.
रसायन थेरपी घेतलेल्या रुग्णांमध्ये भूक मंदावण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचा आहार वाढल्याचे  दिसले व इतरही तक्रारी कमी झाल्याचे आढळले.
– जीवनमानाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने संशोधनातील दोन्ही गटांमध्ये सुधारणा दिसून आली. दोनही चिकित्सेचा रुग्णांना कोणताही विपरीत परिणाम दिसला नाही.

 निष्कर्ष –
या सर्व निरीक्षणावरून हे पुढे आले  की रसायन चिकित्सा ही अशा रुग्णासाठी एक नवी चिकित्सा पद्धति उदयास येऊ शकते. जे  रुग्ण काही कारणास्तव इतर उपचार घेऊ शकत नाही किंवा असे रुग्ण ज्यांना इतर उपचार पद्धती घेऊन सुद्धा  आजारात वाढ झाली अशा रुग्णांवर उपचार हा पुढील संशोधनाचा विषयही यातून पुढे आला.
या संशोधनामुळे यकृताच्या कर्करोग असणाऱ्या प्रगत अवस्थेतील  रुग्णांसाठी
आशेचा नवा किरण आहे. या व्यतरिक्त इतर उपलब्ध चिकित्सा पद्धती सोबत रसायन चिकित्सा घेणाऱ्या  रुग्णांसाठी सुद्धा हि चिकित्सा उपयुक्त सिद्ध झाली आहे.

संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर
यकृताच्या चौथ्या आणि प्रगत अवस्थेतील कॅन्सर असणाऱ्या रुग्ण चिकित्से वर या संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. हे संशोधन युरोपियन आणि जापनीज सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजीच्या जागतिक परिषदेमध्ये  सादर करण्याकरिता स्वीकारण्यात  आले. तसेच, ‘अँनल्स ऑफ ऑन्कॉलॉजी’ या अत्यंत मानाच्या आणि प्रतिष्ठित (ज्याचा इम्पॅक्ट फॅक्टर सुमारे ४२ आहे) अशा नियतकालिकेतही ते प्रसिद्धी साठी स्वीकारण्यात आले आहे. केवळ रसायू मधील वैद्यांनाचा हे महत्वाचे नसून भारत तसेच आयुर्वेदाच्या संपूर्ण वैद्य वर्गाला देखील भूषणावह होय.
पुढील संशोधनाची दिशा- आयुर्वेदाच्या मूळ तत्त्वानुसार वर उल्लेखलेल्या यकृताच्या इतर व्याधींचे कॅन्सर मध्ये परिवर्तन होऊ नये याकरिता प्राथमिक प्रतिबंध करणे.

“रसायू थेरपी ही रोग किंवा औषधकेंद्रीत नसून रुग्णकेंद्रीत उपचार पद्धती आहे. तोंडावाटे हे औषध रुग्णाला दिले जाते. त्यासाठी रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. अत्यंत सुरक्षित अशा या चिकित्सेने  कर्करोगाच्या रुग्णांचे जीवनमान सुधारण्याची क्षमता आयुर्वेदात असल्याचे आधुनिक जागतिक निकषांवर सिद्ध झाले.  हे संशोधन आयुर्वेद शास्त्राला पुराव्यावर आधारित जागतिक ओळख मिळवून देण्यास निश्चित उपयुक्त ठरेल, तसेच भारतीय रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून या कॅन्सरच्या भयानक अवस्थेत देखील अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक चिकित्सा उपलब्ध करून देण्याचे समाधान मिळाले ” या संशोधनामध्ये वैद्य. अविनाश कदम,  वैद्य. पूनम गवांदे, वैद्य. आनंद पाटील वैद्य. हर्षला जगताप – पाटील आणि वैद्य. प्रवीण गुंड हे सहभागी होते.
– वैद्य योगेश बेंडाळे, रसायू कॅन्सर क्लिनिक. पुणे .  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading