TECNO च्या ‘फँटम पायोनियर्स’ मोहिमेने नुकत्याच लाँच केलेल्या Phantom X2 Pro सह उल्लेखनीय भारतीयांचा आनंद साजरा केला.
पुणे : अग्रगण्य जागतिक स्मार्टफोन कंपनी TECNO आपल्या सर्जनशील मार्केटिंग कैम्पेन मध्ये “फँटम पायोनियर्स” भारतीय पायोनियर्सना समोर आणते आणि नवीन PHANTOM X2 Pro सह त्यांचा उत्सव साजरा करते. नवीन स्मार्टफोन फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये हे एक गेम चेंजर आहे आणि त्याच्या अलीकडील पदार्पणामुळे ब्रँडचा भारतातील प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश झाला आहे.
TECNO चे “Stop at Nothing” चे तत्वज्ञान हे आतल्या वाढत्या ताकदीचे स्वरूप आहे आणि हे अपवादात्मक लोकांचे उत्सव साजरे करण्यावर कैम्पेनच्या फोकसच्या अनुषंगाने आहे. व्हिडिओं सिरीज द्वारे सोशल कॅम्पेन मध्ये मसाबा गुप्ता, जेरेमी लालरिनुंगा, आदित्य सील, शर्ली सेटिया, शिवेश भाटिया आणि राज अभिनव यांच्यासह उद्योगातील पायोनियर्सच्या सामान्य गोष्टींचा प्रेरणादायी प्रवास दर्शविते.
या मोहिमेच्या प्रकाशात, ज्याचा उद्देश स्मार्टफोनचा अनुभव पुन्हा परिभाषित करण्याचा आहे, TECNO ने GQ च्या सहकार्याने ” पायोनियर पॉवर फेस्ट” आयोजित केला आहे, जो एक आकर्षक कार्यक्रम आहे, ज्याने विविध शैलीतील समविचारी नवोन्मेषकांचा समुदाय तयार केला आहे. हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या प्रकारचा होता ज्यामध्ये हर्षवर्धन कपूर, मसाबा गुप्ता, रोहित सराफ, ताहिर राज भसीन, आहाना कुमरा यांच्यासह ए-लिस्ट सेलिब्रिटी तसेच सोशल मीडिया इंफ्ल्युएंसर आणि टेक प्रेमी उपस्थित होते.
Phantom X2 सिरीजचे फ्लॅगशिप मॉडेल, Phantom X2 Pro भारतात 24 जानेवारी 2023 रोजी लॉन्च करण्यात आले. Phantom X2 Pro हे माइलस्टोन उत्पादन आहे आणि TECNO च्या जागतिक प्रीमियम ब्रँडिंग धोरणातील पहिले गॅझेट आहे. यात जगातील पहिली कॅमेरा-ग्रेड रिट्रॅक्टेबल पोर्ट्रेट लेन्स, ड्युअल कर्व AMOLED स्क्रीन, आणि डायमेन्सिटी 9000 5G प्रोसेसर यासह उद्योगासाठी पहिली वैशिष्ट्ये आहेत. इनोव्हेटिव्ह, स्टायलिश आणि पॅशनेट हे Phantom X2 Pro चे तीन क्रांतिकारी गुण आहेत.
या मोहिमेबद्दल सविस्तर माहिती देताना, TECNO मोबाईलचे सीईओ अरिजित तलपात्रा म्हणाले, “पायोनियर पॉवर फेस्ट, प्लॅटफॉर्म आमच्यासाठी खूप खास आहे कारण आम्ही तुमच्यासाठी Phantom X2 Pro सादर करतो, ज्यामध्ये नावीन्या सोबत तो एक गेम चेंजर सुद्धा आहे. आकर्षक पोर्ट्रेटसाठी हा फोन जगातील पहिला रिट्रॅक्टेबल कॅमेरा आहे. जे युजर्स प्रवासात व्यावसायिक फोटो काढण्यासाठी त्यांचे प्राथमिक गॅझेट म्हणून स्मार्टफोन चा उपयोग करतात अशा वाढत्या युजर्सना प्रीमियम अनुभव प्रदान करणे ही या मागची कल्पना आहे. स्मार्टफोन हा प्रगत तंत्रज्ञानाचा परिपूर्ण मिलाफ आहे आणि अप्रतिम वैशिष्ट्यांसह उत्कृष्टपणे तयार केलेली रचना आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9000 5G चिपसेटचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन चिपसेट आहे, जे वेग, कार्यप्रदर्शन, ऊर्जा कार्यक्षमता आणि बऱ्याच गोष्टी मध्ये अतुलनीय आहे.”
नेक्स्ट फँटम पायोनियर प्रोग्राम अशा भारतीयांच्या कथा शोधत आहे जे TECNO इंडियाच्या “पेइंग ट्रिब्यूट टू पायोनियर्स” या कल्पनेला प्रतिसाद म्हणून कधीही हार मानत नाहीत. ज्यांना ब्रँड पायोनियर म्हणून वेगळे दिसायचे आहे ते मायक्रोसाइटवर स्वतःची नोंदणी करू शकतात आणि त्यांची माहिती आणि पायोनियर स्लोगन सबमिट करू शकतात. सर्वाधिक पसंती असलेली प्रवेशिका पुढील फेरीत जाते. या नाविन्यपूर्ण आणि अनोख्या मोहिमेच्या विजेत्याला पुढील Phantom X सिरीजचा चेहरा बनण्याची संधी मिळेल.
