fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsLIFESTYLEPUNE

आयआयएचएम च्या ९ व्या यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ स्पर्धेची सांगता

पुणे  –  आयआयएचएम (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) च्या यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ च्या पहिल्या फेरीचे यशस्वी आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १० देशांतील उदयोन्मुख शेफ्स नी भाग घेऊन एकमेकांशी स्पर्धा केली.  सहभागी झालेल्या देशांमध्ये बोट्स्वाना, फ्रान्स, ओमान, सौदी अरेबिया, टर्की, युगांडा, इंग्लंड, नेदरलँड्स, थायलँड आणि बांग्लादेश या देशांचे प्रतिनिधी आयआयएचएम च्या पुणे कॅम्पस मध्ये एकत्र आले होते.

 

सहभागी स्पर्धकांनी प्रमुख परिक्षकांसमोर आपल्या पाककौशल्याचे तीन तास प्रदर्शन केले. उपस्थित परिक्षकांमध्ये हॉस्पिटॅलिटी आणि शेफ क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. ‍विद्यार्थ्यांना या परिक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी यावेळी प्राप्त झाली होती. या परिक्षकांमध्ये मुंबईतील सेलिब्रिटी शेफ, रेस्तरॉरेंटिअर आणि इंडिगो (इंडिया) चे संस्थापक शेफ राहूल अकेरकर, ईहॉटेलियर अकादमीचे डीन (इंग्लंड) शेफ पीटर जोन्स, रॉयल गार्डन हॉटेल (इंग्लंड) चे एक्झिक्युटिव्ह शेफ स्टीव मुंकली, कार्डिफ ॲन्ड वेल्स कॉलेज (वेल्स) चे सिनियर शेफ लेक्चरर शेफ जॉन क्रॉकेट्ट, आयआयएचम पुण्यातील एचओडी फूड प्रॉडक्शन शेफ होशांग देबता आणि भारतीय खाद्य लेखक, टिव्ही पर्सनॅलिटी, ट्रॉफी दि एलिमेंटरे ॲवॉर्ड विजेते कॅरन आनंद यांचा समावेश आहे.

या स्पर्धे दरम्यान विद्यार्थ्यांची परिक्षा ही दोन स्तरांवर घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात स्कील टेस्ट आणि त्यानंतर कुकिंग टेस्ट घेण्यात आली. स्कील टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांची परिक्षा ही कटिंग आणि चॉपिंगच्या तंत्रानुसार असून त्यानंतर कुकिंग टेस्ट मध्ये त्यांनी तयार केलेल्या पदार्थाची चव व सादरीकरणाच्या कौशल्यानुसार मुल्यांकन केले जाते.‍ विद्यार्थ्यांना यावेळी एक मिठाई तयार करुन शाकाहारी पदार्थाचे चार भाग करायचे होते व त्याच बरोबर रेस्टॉरंट प्रमाणे ते सादर करायचे होते.

मुंबईतील सेलिब्रिटी शेफ, रेस्तॉरंटिअर आणि इंडिगो (इंडिया) चे संस्थापक राहूल अकेरकर यांनी यावेळी सांगितले “मी काही काळापासून आयआयएचएम वायसीओ स्पर्धेचा भाग राहिलो आहे आणि महामारी नंतर हा उपक्रम पुन्हा सुरु होतांना मला आनंद होत आहे.  हे पहायला एक आनंददायी गोष्ट आहे की जगभरांतील नवोदित शेफ्स संपूर्ण उर्जेसह एकत्र येत आहेत. ते कशा प्रकारे काम करतात हे पाहणे आणि त्यांना स्पर्धेत सहकार्य करणे हा एक अनोखा अनुभव होता. प्रत्येक चांगल्या शेफची सुरुवात ही चांगली असते आणि हे पाहणे आनंददायी असते की यांची नावे भविष्यात चांगली होऊन त्यांचे पदार्थ ही लोक आवडीने खातील.”

 

आयआयएचएम पुणे चे संचालक आणि वायसीओ २०२३  कार्यकारी समितीचे सदस्य श्री रुपिंदर सिंग खुराणा यांनी सांगितले “ आयआयएचएम च्या पुणे कॅम्पस मध्ये आजचा दिवस हा खूपच आनंददायी आहे.  आम्ही सर्वोत्कृष्ट पाककलेच्या बाजारपेठेतील सर्वोत्कृष्ट कौशल्ये आज पाहिली.  सर्व परिक्षक मंडळाचे सदस्य, सहभागी स्पर्धक, देशभरांतील मार्गदर्शक यांनी जे सहकार्य केले त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.  स्पर्धेची पुढील फेरी ही कोलकाता या सुंदर शहरात होणार असून त्या करता विद्यार्थी आज प्रस्थान करतील.”

पहिल्या फेरी नंतर सर्व स्पर्धक आणि मार्गदर्शक हे स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी सांस्कृतिक शहर कोलकाता कडे प्रयाण करतील.  पहिल्या फेरीतील १० आघाडीचे स्पर्धक हे ग्रॅन्ड फिनाले मध्ये सहभागी होतील, पुढील १० म्हणजेच ११ ते २० व्या क्रमांकाचे स्पर्धक हे प्लेट ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील व उर्वरीत स्पर्धक हे वायसीओ डॉ. सुब्रोनो बोस चॅलेंज मध्ये सहभागी होतील.

अंतिम फेरीतील विजेत्यांना गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ मेडल, प्लेट ट्रॉफी विनर आणि वायसीओ डॉ. सुब्रोनो बोस चॅलेंज चे विजेते आणि अन्य सर्व विजेत्यांची घोषणा ही ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित ग्रॅन्ड फिनाले मध्ये करण्यात येणार आहे.  गोल्ड ‍विजेत्याला ५००० यूएसडॉलर्स, सिल्व्हर विजेत्याला ३००० यूएसडॉलर्स तर ब्राँझ विजेत्याला २००० यूएसडॉलर्सचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

२०२३ हे इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स असल्यामुळे ९ व्या इंटरनॅशनल आयआयएचएम यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ मध्ये ही मोठ्या प्रमाणावर भरडधान्यांचा प्रसार हा प्रामुख्याने करण्यात आला आहे, याकरता त्यांना स्पॉटलाईट मध्ये ठेऊन शाश्वततेचाही प्रसार करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading