Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा 

पुणे : “यशस्वी होण्याची जिद्द, पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठचीधडपड, सामाजिक व कौटुंबिक दबाव यामुळे अनेकदा आपण आपल्यातील कलात्मकता गमावून बसतो. अशा परिस्थितीत स्वत: मधील बलस्थाने ओळखून प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,” असे मत प्रसिद्ध छायाचित्रकार आणि रेड बलून या कंपनीचे संस्थापक समर सिंग जोधा यांनी व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय), पुणे चॅप्टर या संघटनेतर्फे आयोजित १७ वी ‘पुणे डिझाईन फेस्ट २०२३’ ही डिझाईन विषयक राष्ट्रीय परिषद नगर रस्ता येथील हॉटेल हयात रिजेंसी येथे संपन्न होत आहे. ‘नेक्स्ट २५ ‘ अर्थात आगामी २५ वर्षे अशी संकल्पना असलेल्या या परिषदेच्या उद्घाटन सत्रात जोधा यांनी ‘ क्रिएटीव्हीटी वर्सेस इनर व्होईस ‘ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी एडीआय, पुणे चॅप्टर’ चे प्रमुख ऋग्वेद देशपांडे हे उपस्थित होते. परिषदेची सुरूवात ओमकार अग्निहोत्री यांच्या ‘ रेझोनियम ‘ या संगीत सादरीकरणाने झाली.
जोधा म्हणाले, ” कलात्मकता ही ‘कंफर्ट’ अर्थात सोयीस्कर स्वरूपातील नसते, तर ती प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आव्हान देत असते. अनेकदा आपल्याला एखादीगोष्ट जमेल की नाही, आपण अपयशी तर होणार नाही न, असा विचार करत, आपण स्वतः वरच प्रश्न उपस्थित करत असतो. हा न्यूनगंड अनेकदा आपल्याला आपली कलात्मकता जोपासण्यासाठी मारक ठरतो. अशातच आपले मित्र-मैत्रिणी कुटुंबीय यांच्याकडून येणाऱ्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबावामुळे आपल्यातील न्यूनगंड अधिक वाढतो. मात्र अपयशाचा विचार न करता, आपल्या आवडी जोपासण्याला अधिक प्राधान्य द्यावे.
दुसऱ्या सत्रात अर्जुन कुरुंजी, अदिती अगरवाल, प्रमोद रंजन आणि अनिकेत दास यांनी ‘ यंग चेंज मेकर्स ‘ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वेंकट यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading