पाचव्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, टेनिसनट रॉजर, एफसी जीएनआर, एमडब्ल्युटीए अ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पुणे : मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने आयोजित व नंदन बाळ टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या सहकार्याने होत असलेल्या पाचव्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत डेक्कन चार्जर्स, टेनिसनट रॉजर, एफसी जीएनआर व एमडब्ल्युटीए अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत डेक्कन चार्जर्स संघाने फ्री रॅडिकल्स संघाचा 24-5 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. विद्याधर हुमनाबादकर, आशिष पुंगलिया, मुकुंद जोशी, चिराग शहा, सिद्धार्थ देसाई,यश चावडा, अजित साईल व मदन गोखले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला. दुस-या लढतीत टेनिसनट रॉजर संघाने महाराष्ट्र मंडळ 1 संघाचा 18-13 असा पराभव केला.
अन्य लढतीत पंकज यादव, मनोज देशपांडे, पुष्कर पेशवा , आदित्य अभ्यंकर, शांभवी नाडकर्णी व गणेश देवखिके यांनी विजयी कामगिरी करत एफसी जीएनआर संघाला डेक्कन ग्लॅडिएटर्स संघावर 21-12 असा विजय मिळवून दिला. शेवटच्या उपांत्यपुर्व लढतीत एमडब्ल्युटीए अ संघाने सोलारिस ईगल्स संघाचा 24-10 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्यपूर्व फेरी
डेक्कन चार्जर्स वि.वि फ्री रॅडिकल्स : 24-5
100 अधिक: विद्याधर हुमनाबादकर/आशिष पुंगलिया वि.वि गिरीश कुलकर्णी /आशुतोष शर्मा 6-0
90 अधिक: मुकुंद जोशी/ चिराग शहा वि.वि गिरीश कुकरेजा /सचिन माधव 6-1
खूला गट 1: सिद्धार्थ देसाई / यश चावडा वि.वि अनंत गुप्ता/ शिलादित्य बॅनर्जी 6-1
खूला गट 2: अजित साईल /मदन गोखले वि.वि विशाल साळवी / योगेश आहेर 6-3
टेनिसनट रॉजर वि.वि महाराष्ट्र मंडळ 1: 18-13
100 अधिक: राजेश मित्तल /संदीप बेलुडी वि.वि संजय सेठी /विकास बच्लू 6-1
90 अधिक: सुनील लुल्ला / जॉय बॅनर्जी वि.वि अर्पित श्रॉफ /राजेंद्र देशमुख 6-1
खूला गट 1: संदीप बेलुडी /रवी कोठारी वि.वि प्रथमेश शिंदे /श्रीराम ओक 6-5(6)
खूला गट 2: व्यंकटेश आचार्य / नितीन सावंत पराभूत वि आकाश खैरे/ धरणीधर मिश्रा यांना 0-6
एफसी जीएनआर वि.वि डेक्कन ग्लॅडिएटर्स: 21-12
100 अधिक: पंकज यादव /मनोज देशपांडे वि.वि अमित पाटणकर / विक्रम उमराणी 6-3
90 अधिक: पुष्कर पेशवा /आदित्य अभ्यंकर वि.वि आदित्य खटोड / प्रशांत जेटली 6-1
खूला गट 1: संग्राम चाफेकर / वैभव अवघडे पराभूत.वि सदानंद कोटस्थाने /चिराग रुणवाल 3-6
खूला गट 2: शांभवी नाडकर्णी / गणेश देवखिके वि.वि वेद भंडारे / करण बापट 6-2,
एमडब्ल्युटीए अ वि.वि सोलारिस ईगल्स: 24-10
100 अधिक: सुमंत पॉल / राजेश मंकणी वि.वि जयंत पवार / सिद्धार्थ जोशी 6-1
90 अधिक: जयदीप वाकणकर / कौस्तुभ देशमुख वि.वि रवी कात्रे / संजीव घोलप 6-3
खूला गट 1: आशिष मणियार / विवेक खडगे वि.वि निनाद वाहीकर / सिद्धार्थ जोशी 6-3
खूला गट 2: मंदार वाकणकर/ सिद्धार्थ बस्नेत वि.वि रवींद्र पांडे/ संतोष दळवी 6-3
