fbpx

‘द इको फॅक्टरी फाऊंडेशन’ संस्थेतर्फे ७५ हजार रोपांचे दान

पुणे : पुणेस्थित द इको फॅक्टरी फाऊंडेशन (टीईएफएफ) या विना-नफा स्वयंसेवी संस्थेची स्थापना आनंद चोरडिया यांनी वर्ष २०१६ मध्ये केली. ही संस्था ग्रामीण, शहरी व औद्योगिक क्षेत्रात शाश्वतता प्राप्त करण्यासाठी अथक कार्यरत आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७५वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आनंद चोरडिया यांनी ७५,०००+ भारतीय वंशाच्या जातींची रोपे / झाडे दान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार टीईएफएफ संस्थेने गेल्या वर्षापासून भारतीय देशी झाडांच्या ३७ जातींची ७५,००० रोपे आदिवासी महिलांकडून बनवून घेऊन, वाढवून ती कंपन्या, शाळा/महाविद्यालये आणि जबाबदार नागरिकांच्या गटाला दान केली आहेत. ह्या उपक्रमामुळे आदिवासी महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. जैववैविध्य जतन करणे व पडीक जमीन सुपीक करणे या उद्देशाने गेल्या १५ ऑगस्टला सुरू झालेला हा उपक्रम नुकताच पूर्ण झाला.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद चोरडिया म्हणाले, “ आपल्या राष्ट्राचे आरोग्य मातीच्या आरोग्यात सामावलेले आहे आणि जोडीलाच कचऱ्यातून संपत्ती व कचऱ्यातून आरोग्य या संकल्पनेवर माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळे आपण या दिशेने प्रयत्न केले आणि प्रत्येकाला शाश्वत जगण्यासाठी सक्षम बनवले तर देशाला स्वच्छ, हरित, आरोग्यपूर्ण आणि संपन्न बनवू शकतो. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही आमचा वाटा उचलला ही भावना खूप सुखद आहे. मी आनंदी आणि समाधानी असून यापुढेही खूप काही काम करण्याची अपेक्षा बाळगून आहे.”

या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना श्री. चोरडिया म्हणाले, की विविध प्रकल्प संघटितरीत्या राबवण्यासाठी आम्ही आमची कार्यपद्धती चार ‘एस’मध्ये विभागली आहे. हे चार ‘एस’ म्हणजे सेवा, सेतू, सत्त्व आणि संवर्धन. यातून शाश्वत जीवनशैली आणि प्रथा अंगिकारण्याचा आमचा हेतू आहे.” फाऊंडेशनने विविध ठिकाणे, संस्था व खासगी शेतांमध्ये रोपांचे वितरण हाती घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येक व्यक्तीत आरोग्यपूर्ण जीवनशैली रुजवण्यासाठी प्रत्येकाला शाश्वत जीवन सक्षमीकरणाचा प्रवर्तक बनवणे आणि समाज, पृथ्वी व संपन्नता यासाठीच्या पारंपरिक पण अभिनव पद्धतींची जोपासना करणे, हे श्री. चोरडिया यांचे उद्दिष्ट आहे. धरतीला हिरवीगार बनवणे, जैवविविधतेत सुधारणा व संवर्धन आणि भारतीय देशी वृक्षांचे संवर्धन यासाठी आम्ही अथक काम करत आहोत, असेही त्यांनी बोलून दाखवले.

‘द इको फॅक्टरी फाऊंडेशन’ने ग्रामीण, शहरी, औद्योगिक व वैयक्तिक शाश्वतता या चार मूलभूत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी मोहिम सुरू केली आहे. त्याचे उद्देश पुढीलप्रमाणे –  

अ) नागरी व औद्योगिक क्षेत्रांत बहुशाखीय मार्गाने जीवनाच्या शाश्वत पद्धतीचा प्रसार करणे.

ब) भारतातील पहिल्या  कचरा  व्यवस्थापन  वाटिकेच्या  पर्यावरण  उद्योजकतेला  मदत व प्रसार करणे

क) शाश्वत  भारत  कृषी  रथाच्या  माध्यमातून  ग्रामीण  पातळीवर  व्यवसाय  संधी  निर्माण  करणे 

ड) शून्य हरितगृह वायू उत्सर्जनाचे (नेट झिरो) लक्ष्य गाठणे.

Leave a Reply

%d bloggers like this: