fbpx

कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी पीएमपीएमएलकडून विशेष बससेवा

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दि. १ जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना
कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. कोरेगांव-भिमा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाच्या वतीने दि. ३१ डिसेंबर 2022 व 1 जानेवारी 2023 रोजी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ९ ते दि. १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान येथून ४० बसेस, वढू फाटा (इनामदार हॉस्पिटल) ते वढू करिता ५ बसेस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भिमा कोरेगांव पर्यंत ३५ बसेस अशा एकूण ८० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच
दि. १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ,
फुलगाव शाळा ते पेरणे टोल नाका पर्यंत १४० बसेस व शिक्रापूर रोड (तोरणा हॉटेल) ते भिमा कोरेगांव पर्यंत ११५ बसेस आणि वढू फाटा ते वढू पर्यंत २५ बसेस अशा एकूण २८० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध स्थानकांवरून प्रवास भाडे आकारणी करून जादा बसेसचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ८ बसस्थानकांवरून नियमित मार्गाच्या ५५ व जादा ३५ अशा एकूण ९० बसेसचे संचलन करण्यात येणार आहे. तरी भाविक व नागरिकांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: