वंचित कडुन, काँग्रेसकडे आघाडी बाबत स्पष्ट प्रस्ताव नव्हता – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका वा नगर परिषदां मध्ये ‘काँग्रेस सोबत आघाडी साठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सर्वश्री प्रियदर्शनी तेलंग व सरचिटणीस प्रफुल गुजर हे आपल्या ‘पुणे कार्यालयात’ भेटण्यास आले होते हे सत्य आहे. त्यावेळी लोकशाही मुल्ये व संविधान वाचवणे बाबत मतांची विभागणी टाळणे विषयी सकारात्मक चर्चा देखील झाली.. मात्र आपण त्यांना पक्षाध्यक्ष श्री प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे कडुन ‘वंचित बहुजन आघाडी पक्षाची मतें, बलस्थाने, स्ट्रेंथ व अपेक्षा’ या विषयी काही ‘धोरणात्मक स्पष्टता दर्शवणारा’ कोणताही लेखी प्रस्ताव आल्यास, आपण तो मा प्रदेशाघ्यक्ष श्री नाना पटोले व पक्षश्रेष्ठीं समोर मांडू व त्या दृष्टीने जेष्ठ नेत्यांची बैठक ही आयोजित करू असे आपण सांगितले असल्याचा खुलासा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी स्पष्ट केले. तसेच ही बाब मा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील कळवली. मात्र त्या नंतर कोणतेही पत्र वा लेखी प्रस्ताव ‘वंचित बहुजन आघाडी’ कडून आला नसल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी स्पष्ट केले.. मात्र काही माध्यमां समोर मुलाखतीत मा प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रवक्त्यांकडे (अर्थात माझे कडे) युती – आघाडी बाबत प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. त्यामुळे ही बाब वास्तवतेला धरून नसल्याने, काँग्रेस विषयी गैरसमज नसावा याच हेतुने सदर खुलासा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस करीत असल्याचे प्रवक्ते गेपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.. जातीयवादी फॅसिस्ट शक्तींना रोखण्या करीतां, संविधान मुल्ये वाचवण्या करीता व मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सदैव सकारात्मक भुमिकेत आहे, मात्र कृतीने निर्णयात्मक ठोस पावले बहुजन वंचित पक्षाकडुन उचलली गेल्यासच, पुढे आघाडी बाबत बोलणी होऊ शकतात असेही त्यांनी नमुद केले..!
