fbpx

अहिल्यादेवी शाळेत स्नेहसंमेलन संपन्न

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) अहिल्यादेवी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नृत्य आणि नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. लेखीका डॉ. संगीता बर्वे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई, कार्याध्यक्षा मेघना वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या बालसाहित्य पुस्तकाला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला आहे.

बर्वे म्हणाल्या, ‘मला तुमची शाळा खूप आवडते. टेरेसवर बाग फुलवने, मातीविना शेती या उपक्रमांमुळे तुमची सृजनशीलता वाढते.’ तसेच लिखानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.’

कुंटे म्हणाले, शिक्षण म्हणजे फक्त खडू, फळा नसून कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होते.’ जानेवारी महिन्यात होणाऱ्या सूर्यनमस्कार आणि क्रीडा सर्धेची घोषणा त्यांनी योवळी केली.

मुख्याध्यापिका अनघा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी कुलकर्णी, रोहिणी रावते, अर्चना कुलकर्णी यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: