Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

रमणबाग शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत ‘विविधतेतून एकता’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध राज्यांच्या नृत्य प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. विविध प्रांतांची माहिती देण्यात आली. क्रमिक अभ्यासक्रमाच्या विषयांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ई-कचरा संकलन मोहिम राबविण्यात आली.

दलित इंडिया कॉमर्स ॲण्ड इंडस्जिचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा वसा रमणबाग शाळा चालवित असल्याचे गौरवोद्गार कांबळे यांनी काढले.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. शाला समितीचे अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, शालाप्रमुख सुनील शिवले, पर्यवेक्षक दिलीप रावडे, सुरेश वरगंटीवार, ब्रम्हेंद्र शेटे, जयंत टोले, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल परब आणि विद्या थोरात यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading