fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsSports

यश, मीर, हृदान उपांत्य फेरीत

पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत हृदान पाडवे, सिबतैनरझा सोमजी, यश मोरे, मीर शहझार अली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून ११ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. अकरा वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित हृदानने आरुष दुग्गलला १५-३, १५-१२ असे पराभूत केले. हृदानची आता सोमजीविरुद्ध लढत होईल. सोमजीने उपांत्यपूर्व फेरीत जतिन सराफवर १७-१५, १५-८ असा विजय मिळवला. यानंतर यश मोरेने शरव जाधवचे आव्हान १५-१२, १३-१५, १५-१२ असे परतवून लावले. यशची आता उपांत्य फेरीत मीरशी गाठ पडणार आहे. मीरने दुसऱ्या मानांकित मिहीर इंगळेला १५-९, १५-९ असा पराभवाचा धक्का दिला.

शरयू, आर्याची आगेकूच
यानंतर १३ वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित शरयू रांजणे, आर्या कुलकर्णी, चौथ्या मानांकित अनुषा संजना, दुसऱ्या मानांकित सोयरा शेलार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत शरयूने मधुरा काकडेला १६-१४, १५-१२ असे नमविले. शरयूची आता आर्या कुलकर्णीविरुद्ध लढत होईल. आर्याने तिसऱ्या मानांकित ख्याती कत्रेला ११-१५, १७-१५, १८-१६ असा पराभवाचा धक्का दिला. यानंतर अनुषाने सई आगवणेला १५-१०, १५-७ असे नमविले, तर सोयराने आयुषी मुंडेवर ७-१५, १७-१५, १५-८ असा विजय मिळवला.

निकाल : उपांत्यपूर्व फेरी – महिला एकेरी – ओजल रजक वि. वि. दिव्यांश वहाळ १४-१६, १५-७, १५-८; श्रेया भोसले वि. वि. खुशी सिंग १५-९, १३-१५, १५-५; सारिका गोखले वि. वि. रक्षा पंचांग १५-११, १५-१२; अस्मिता शेडगे वि. वि. अनन्या देशपांडे १५-१२, १५-८.

११ वर्षांखालील मुले -अरहम रेदासनी वि. वि. ध्रुव बर्वे १५-३, १५-९; एल. अभिज्ञान सिंह वि. वि. स्वरित सातपुते १५-१२, १५-१२; कपिल जगदाळे वि. वि. तनिष्क अदे १५-५, १५-९; विराज सराफ वि. वि. रघवेंद्र यादव १५-१२, १५-६.

१५ वर्षांखालील मुले – कोणार्क इंचेकर वि. वि. अरहम रेदासनी १६-१४, १५-९; ध्रुव निकम वि. वि. अवधूत कदम १२-१५, १५-१३, १५-५; निक्षेप कत्रे वि. वि. चैतन्य परंडेकर १५-९, १५-१३; सार्थक पाटणकर वि. वि. अर्जुन देशपांडे १५-५, १०-१५, १५-५.

१५ वर्षांखालील मुली – श्रेया चौधरी वि. वि. प्राजक्ता गायकवाड १५-७, १५-९; राधा गाडगीळ वि. वि. सफा शेख १७-१५, १५-१३; नव्या रांका वि. वि. सन्मती रूगे १५-१०, १५-८; यशस्वी काळे वि. वि. भक्ती पाटील १३-१५, १५-४, १५-८.

१७ वर्षांखालील मुले – सार्थक पाटणकर वि. वि. वेदांत सरदेशपांडे १७-१५, १२-१५, १५-११; कृष्णा जसुजा वि. वि. श्लोक डागा १५-१०, १५-८; क्रिश खटवड वि. वि. यशराज कदम १५-९, ८-१५, १५-९; आद्य पारसनीस वि. वि. ईशान देशपांडे १५-११, ७-१५, १५-११.

१९ वर्षांखालील मुले – लौकिक ताथेड वि. वि. सुजल लखारी १५-१२, १५-६; वेदांत सरदेशपांडे वि. वि. चैतन्य खरात १०-१५, १५-१२, १५-१३; कृष्णा जसुजा वि. वि. ईशान देशपांडे १२-१५, १८-१६, १५-११; सर्वेश हाउजी वि. वि. वर्धन डोंगरे १५-१२, १५-८.

१९ वर्षांखालील मुली – अनन्या गाडगीळ वि. वि. आंचल जैन १५-१०, १३-१५, १५-१३; अस्मिता शेडगे वि. वि. अनन्या देशपांडे ११-१५, १६-१४, १५-१०; श्रेया शेलार वि. वि. दिव्यांश वहाळ १५-७, १५-९; ओजल रजक वि. वि. सानिका पाटणकर १५-७, १५-१७, १५-१२.

Leave a Reply

%d bloggers like this: