fbpx

ओजल, सानिका, आंचल उपांत्यपूर्व फेरीत

पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत आंचल जैन, अस्मिता शेडगे, ओजल रजक, सानिका पाटणकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या फेरीत आंचल जैनने संयुक्ता मानेला १५-१, १५-४ असे, तर अग्रमानांकित अनन्या गाडगीळने श्रेया गुरवला १५-२, १५-१ असे सहज नमविले. अस्मिता शेडगेने खुशी सिंगवर १५-१२, १३-१५, १५-१३ असा, तर अनन्या देशपांडेने अपूर्वा घावतेवर १५-८, १५-६ असा, श्रेया शेलारने जिज्ञासा चौधरीवर १५-७, १५-९ असा विजय मिळवला. ओजल रजकने अनाहिता शर्माचे आव्हान १५-८, १५-१२ असे परतवून लावले. ओजलची आता उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित सानिका पाटणकरविरुद्ध लढत होईल. सानिकाने श्रेया भोसलेवर ८-१५, १५-१०, १८-१६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

विनीत, जयेशची आगेकूच
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत अग्रमानांकित विनीत कांबळेने अथर्व चव्हाणला १५-४, १५-१० असे नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यानंतर जयेश महाजनने वेंकटेश अगरवालला १५-१३, १७-१५ असे, प्रणव गावडेने अभिजित कदमला १७-१५, १६-१४ असे, ईशान मेहेंदळेने ऋतुराज नाईकला १५-११, १३-१५, १५-९ असे नमविले. दुसऱ्या मानांकित चिराग भगतने विवेक मिसाळला १५-८, १५-५ असे पराभूत करून आगेकूच कायम राखली.

निकाल : १९ वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – वर्धन डोंगरे वि. वि. अनय चौधरी १५-१३, १५-६; सर्वेश हाउजी वि. वि. पार्थ फिर्के १५-३, १५-७; ईशान देशपांडे अश्वजित सोनावणे १५-८, ९-१५, १५-१३; कृष्णा जसुजा वि. वि. अर्णव लुणावत १५-११, १५-११; वेदांत सरदेशपांडे वि. वि. मिमांशू गोगोई १५-१२, ११-१५, १५-१२; चैतन्य खरात वि. वि. जयंत कुलकर्णी १५-७, १५-५; सुजल लखारी वि. वि. वात्सल्य गर्ग १५-५, १५-१२; लौकिक ताथेड वि. वि. प्रणव गावडे १५-१३, ११-१५, १५-८.

११ वर्षांखालील मुले – चौथी फेरी – मिहिर इंगळे वि. वि. शरमन सपकाळ १५-४, १५-६; मीर अली वि. वि. अनुज भोसले १५-४, १५-५; यश मोरे वि. वि. अन्वय समग १५-६, ११-१५, १५-११; शरव जाधव वि. वि. पार्थ शिंदे १५-११, १५-१२; जतिन सराफ वि. वि. अर्जुन श्रीगडीवार १५-१३, १५-९.
११ वर्षांखालील मुली – तिसरी फेरी – ध्रुवी कुंबेफाळकर वि. वि. रिधिमा पवार १५-१२, १५-१३; गार्गी कामठेकर वि. वि. आद्या गाडगीळ १५-५, १५-९; समन्वया धनंजय वि. वि. क्रिशांगी असिजा १५-६, १५-७; जॅस्नम चहल वि. वि. स्वास्ती रूगे १५-८, १५-१०; उत्कर्षा शर्मा वि. वि. रिषिका रसाळ १५-११, १५-१०; ख्याती कत्रे वि. वि. दिविशा मान १५-३, १५-४.

१३ वर्षांखालील मुले – चौथी फेरी – राघवेंद्र यादव वि. वि. अभिक शर्मा १५-७, १५-१२; विराज सराफ वि. वि. जतिन सराफ १५-८, १५-५; कपिल जगदाळे वि. वि. सिद्धार्थ पनिस्कर १५-८, १५-१३; तनिष्क आडे वि. वि. सयाजी शेलार १५-८, १५-११; स्वरित सातपुते वि. वि. आर्यन निबे १५-२, १५-४; ध्रुव बर्वे वि. वि. आरुष अरोरा १५-१०, १५-९.

१३ वर्षांखालील मुली – चौथी फेरी – सोयरा शेलार वि. वि. सानिका बागळे १५-४, १५-७; आयुषी मुंडे वि. वि. अभिज्ञा ठोंबरे १५-१३, १५-९; अनुशा सुजान वि. वि. अनुष्का रुपडे १५-८, १५-३; सई आगवणे वि. वि. जनिशा असिजा १५-९, १६-१४; आर्या कुलकर्णी वि. वि. प्राजक्ता गायकवाड १५-११, १०-१५, १५-१२.

१५ वर्षांखालील मुले – पाचवी फेरी – सार्थक पाटणकर वि. वि. विहान मुर्ती १५-१२, १५-५; अर्जुन देशपांडे वि. वि. ओजस सोरटे १५-०, १५-५; निक्षेप कात्रे वि. वि. श्रेयस एम. १५-७, १५-१०; चैतन्य परंडेकर वि. वि. ऋषभ दुबे १५-११, १५-८.

Leave a Reply

%d bloggers like this: