fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

तुळशीपूजन दिनानिमित्त एकाच वेळी १५०० तुळशी रोपांचे पूजन व ५००० तुळशी रोपांचे वाटप 

पुणे : आरोग्यवर्धक, सुख-शांतीप्रदायक, प्रदूषणनाशक अशी ओळख असलेल्या तुळशीच्या रोपांचे पुणेकरांनी पूजन करीत तुळशीपूजन दिवस उत्साहात साजरा केला. मंडई परिसरात झालेल्या कार्यक्रमात एकाच वेळी १५०० तुळशीरोपांचे पूजन करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

निमित्त होते, श्री योग वेदांत सेवा समिती पुणे तर्फे तुळशीपूजन दिनानिमित्त १५०० तुळशीच्या रोपांचे विधीवत पूजन व ५००० रोपांचे वाटप मंडईतील शारदा गजानन मंदिराशेजारील प्रांगणात करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका अ‍ॅड.गायत्री खडके, ह.भ.प.बाळासाहेब महाराज वायाळ, समितीचे अध्यक्ष चेतन चरवड, सचिव राकेश श्रीवास्तव, सुहास देवरे, अलका काळे, ललिता चौधरी, गणेश सुर्वे, गुरुनाथ कोळपे आदी उपस्थित होते. संत श्री आशारामजी  बापूंद्वारे प्रेरित तुळशी पूजन दिवस कार्यक्रम सन २०१४ मध्ये सुरु झाला आहे

अ‍ॅड. गायत्री खडके म्हणाल्या, प्रत्येकाने दिवसाच्या सुरुवातीला आणि सायंकाळी तुळशीला वंदन करायला हवे. तुळशीचे पूजन देखील करायला हवे. पर्यावरणाशी आपली नाळ तुटू नये, याकरिता तुळशी सारख्या औषधी वनस्पतीचे संवर्धन व पूजन व्हायला हवे. जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाचा होणारा -हास रोखण्यास आपण पुढाकार घेणे गरजेचे आहे.

चेतन चरवड म्हणाले, संत श्री आशारामजी बापू यांनी सन २०१४ मध्ये तुलशी पूजन दिवसाची सुरुवात केली. आज सुमारे २०० देशांमध्ये आणि पूर्ण भारतभर प्रत्येक वर्षी २५ डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. तुळशीचे अनेक लाभ असून तुळशीचे रोपण प्रत्येकाने केले पाहिजे. तुळशीपत्र हे उत्कृष्ट रसायन असून ती अत्यंत उपयोगी अशी औषधांची खाण आहे. मानवी जीवनासाठी अमृत असलेल्या तुळशीचे संवर्धन व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. ह.भ.प.बाळासाहेब महाराज वायाळ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. माया म्याकल यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading