एमएसएलटीए मास्टर्स टेनिस स्पर्धेत अधिराज दुधाणे, आरव छल्लाणी, मायरा शेख, तमन्ना नायर, वरद उंद्रे, दक्ष पाटील यांचा अंतिम फेरीत प्रवेश
पुणे : एमएसएलटीए मास्टर्स 10 , 12 व 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेत अधिराज दुधाणे, आरव छल्लाणी, मायरा शेख, तमन्ना नायर, वरद उंद्रे व दक्ष पाटील यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट पुणे, येथे सूरू असलेल्या 10 वर्षांखालील गटात उपांत्य फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात
अधिराज दुधाणेने सोहम राठोडचा 6-2, 6-1 असा तर आरव छल्लाणीने तक्षील नागरचा 6-2, 6-1 असा तर मुलींच्या गटात मायरा शेखने हर्षा देशपांडेचा 6-3, 6-4 असा तर तमन्ना नायरने नक्षत्रा अय्यरचा 6-1, 6-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.नाशिक जिल्हा टेनिस असोसिएशन टेनिस कोर्ट येथे सूरू असलेल्या 12 वर्षांखालील गटात मुलांच्या गटात उपांत्य फेरीच्या लढतीत वरद उंद्रेने दर्श खेडेकरचा 6-2, 6-4 असा तर दक्ष पाटीलने प्रज्ञेश शेळकेचा 6-2, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन टेनिस कोर्ट येथे सूरू असलेल्या राऊंड रॉबिन फेरीत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात अवनीश चाफळे, अर्णव पापरकर व शिवतेज शिरफुले तर मुलींच्या गटात नैनिका बेंद्रम व सेजल भुतडा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी
10 वर्षाखालील मुले:(पुणे)
अधिराज दुधाणे वि.वि सोहम राठोड 6-2, 6-1
आरव छल्लाणी वि.वि तक्षील नागर 6-2, 6-1
10 वर्षांखालील मुली: (पुणे)
मायरा शेख वि.वि हर्षा देशपांडे 6-3, 6-4
मायरा शेख वि.वि हर्षा देशपांडे 6-3, 6-4
तमन्ना नायर वि.वि नक्षत्रा अय्यर 6-1, 6-0
उपांत्य फेरी: 12 वर्षांखालील मुले:(नाशिक)
वरद उंद्रे वि.वि दर्श खेडेकर 6-2, 6-4
दक्ष पाटील वि.वि प्रज्ञेश शेळके 6-2, 6-4
राऊंड रॉबिन फेरी:
12 वर्षांखालील मुली:(नाशिक)
12 वर्षांखालील मुली:(नाशिक)
रितिका डावलकर वि.वि ईशाल पठाण 4-0, 4-5(3), 7-4
जान्हवी चौघुले वि.वि रित्सा कोंदकर 4-1, 4-2
जान्हवी चौघुले वि.वि रित्सा कोंदकर 4-1, 4-2
स्वानिका रॉय वि.वि वृंदिका राजपूत 4-2, 4-0
रितिका डावलकर वि.वि जान्हवी चौघुले 4-2, 4-1
रितिका डावलकर वि.वि जान्हवी चौघुले 4-2, 4-1
14 वर्षांखालील मुले: (कोल्हापूर)
अवनीश चाफळे वि.वि ओम वर्मा 2-4, 4-2(7-2)
अवनीश चाफळे वि.वि मनन अग्रवाल 4-2, 5-3
अर्णव पापरकर वि.वि विश्वजीत सणस 4-1, 4-0
शिवतेज शिरफुले वि.वि आयुष पुजारी 3-5, 4-1(7-1)
14 वर्षांखालील मुली: (कोल्हापूर)
नैनिका बेंद्रम वि.वि रिद्धी शिंदे 4-0, 4-1
सेजल भुतडा वि.वि देवश्री महाडेश्वर 4-0, 5-3