fbpx

तनिष्क सादर करत आहे ‘कलर मी जॉय – द कार्निवल एडिट’

पुणे :  सुट्ट्यांच्या या सीझनमध्ये उठावदार रंगांशी दोस्ती करा आणि विविध रंगछटा व आकारांसह तुमचा आनंद साजरा करा. भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य तनिष्कने अतिशय अनोखे कॉकटेल कलेक्शन सादर करत असल्याची घोषणा केली आहे – कलर मी जॉय – द कार्निवल एडिट‘. मनामध्ये आशा आणि आनंद निर्माण करणारे हे ज्वेलरी कलेक्शन मौल्यवान रंगीबेरंगी खड्यांच्या रूपाने साकार करण्यात आलेल्या रंगांच्या सिम्फनीने प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे.

हे कलेक्शन मनामध्ये उत्साह जागवतेआत्मिक मुक्ती वाढवण्यासाठी हे डिझाईन करण्यात आले आहे. कलर मी जॉयची अजून एक प्रेरणा आहे कार्निवल आणि त्यांचे रंगीबेरंगी वैभव. कार्निवल राइड्सत्यातील चमचमते ग्लॅमररंगीबेरंगी बॉबल्स आणि कार्निवलमधील मिरवणुका इत्यादींनी प्रेरित होऊन या दागिन्यांची रचना करण्यात आली आहे. हिरे आणि ऍक्वामरीनऍमेथिस्टएमराल्डपिंक ओपल व ब्ल्यू टोपाझ यासारख्या रंगीत जेमस्टोन्सचा अनोखा मिलाप साधून यामध्ये ग्लॅमर व लालित्य निर्माण करण्यात आले आहे. कार्निवलमधील उत्साह आणि आनंद यामध्ये ठायीठायी जाणवतो.

आनंदाची अनेक रूपे असतातत्यामध्ये तो शोधा आणि एखाद्या स्वप्नाप्रमाणे सर्व इंद्रियांच्या पलीकडे जाऊन त्याची अनुभूती घ्या. १८ कॅरेट सोन्यामध्ये तयार करण्यात आलेल्या तनिष्कच्या कलर मी जॉय कलेक्शनमध्ये शानदार कॉकटेल रिंग्सकफ बँगल्सपेंडंट सेट्स व इयररिंग्ज आहेत. या कलेक्शनला जागतिक अपील देण्यासाठी फॅन्सी आकाराचे रंगीत खडेअपारंपरिक डिझाइन्स आणि हिऱ्यांची शान यांचा वापर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या पेहरावांना अनुसरून विविध लूक्समध्ये दागिने स्टाईल करण्याची आवड असलेल्या स्टाईलप्रेमींसाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे.  विशेष प्रसंगकॉकटेल व लंच पार्ट्यांसाठी ते अतिशय साजेसे आहे.

टायटन कंपनी लिमिटेडच्या चीफ डिझाईन ऑफिसर रेवती कांत यांनी या अप्रतिम कलेक्शनच्या लॉन्च प्रसंगी बोलताना सांगितले की, “तनिष्कने नेहमीच संस्कृतीशैली आणि कालखंडाच्या पलीकडे जाऊन अनोखेअद्वितीय दागिने प्रस्तुत करून महिलांचा आनंद साजरा केला आहे. आज आपण आत्म-अभिव्यक्तीच्या नवीन युगात प्रवेश करत असतानातनिष्क डिझाइन्स समकालीन सिल्हटसह भावनिक अर्थ अधोरेखित करतात. आमचे कलर मी जॉय- कार्निव्हल एडिट कलेक्शन हे आजच्या स्त्रीसाठी एक संदेश आहे जी असे मानते की जीवन एखाद्या कार्निव्हलपेक्षा कमी नाही आणि स्वत:चा खरा आदर्श निर्माण करण्यावर विश्वास ठेवते. या कलेक्शनमध्ये बारकाव्यांवर विशेष लक्ष देण्यात आले आहेतेजस्वीफॅन्सी-कट हिरे आणि चमकदार सेमी-प्रेशियस रंगीत जेमस्टोन्स महिलेचे प्रभावी व्यक्तिमत्व साजरे करतात. हे कलेक्शन परिधान करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व खुलवतात. आम्हाला आशा आहे की यंदाच्या सीझनमध्ये रंगांचे प्रकार आणि सिम्फनीचा आनंद तुम्हाला आत्मिक शांती मिळवून देईल.”

कलर मी जॉय हा तनिष्कमधील शानदार व कलात्मकतेने घडवण्यात आलेल्या डिझाइन्सचा उत्सव आहे. या विशेष कॉकटेल कलेक्शनच्या किमती १ लाख रुपयांपासून पुढे असून निवडक तनिष्क स्टोर्समध्ये व तनिष्कच्या https://www.tanishq.co.in/shop/colour-me-joy ईकॉमर्स वेबसाईटवर त्याची खरेदी करता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: