fbpx

अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत टेनिस नट्स राफा, महाराष्ट्र मंडळ, पीसीएलटीए, टेनिस नट्स रॉजर यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित व आयकॉन ग्रुप पुरस्कृत अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत टेनिस नट्स राफा, महाराष्ट्र मंडळ, पीसीएलटीए, टेनिस नट्स रॉजर या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

 
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत कमलेश शहा, राजेंद्र देशमुख,  अभिषेक चौहान, विक्रम बचलू यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र मंडळ संघाने ऍडवांटेज सोलारिसचा 13-07 असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत पीसीएलटीए संघाने फ्री रॅडिकल्स संघाचा 15-14 संघर्षपूर्ण पराभव केला. 
 
अन्य लढतीत टेनिस नट्स रॉजर संघाने एफसी क संघाचा 18-01 असा एकतर्फी पराभव केला. विजयी संघाकडून जॉय बॅनर्जी, संदीप बेलुडी, रवी कोठारी, अमित किंडो, राहुल कोठारी, नितीन सावंत यांनी अफलातून कामगिरी केली. टेनिस नट्स राफा संघाने सोलारिस गो गेटर्स संघावर 18-07 असा विजय मिळवला.        

 

 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
महाराष्ट्र मंडळ वि.वि.ऍडवांटेज सोलारिस 13-07(90अधिक गट: कमलेश शहा/राजेंद्र देशमुख वि.वि.दिपक होनकन/सचिन लाखे 6-0; खुला गट: संजय सेठी/अर्पित श्रॉफ पराभूत वि.यशराज उभे/अनिरुद्ध भल्ला 1-6; खुला गट: अभिषेक चौहान/विक्रम बचलू वि.वि.अजिंक्य पाटणकर/जितेंद्र सावंत 6-1);
 
पीसीएलटीए वि.वि.फ्री रॅडिकल्स 15-14(90अधिक गट: राजेश मित्तल/कुरियन थडियन पराभूत वि.गिरीश कुकरेजा/सचिन माधव (0)5-6; खुला गट: रवी जौकनी/कल्पेश मकनी वि.वि.श्रीराम ओक मनीष टिपणीस 6-2; खुला गट: निर्मल वाधवानी/गौतम सोपल पराभूत वि.शैलेजा बी/अनंत गुप्ता 4-6);
 
टेनिस नट्स रॉजर वि.वि.एफसी क 18-01(90अधिक गट: जॉय बॅनर्जी/संदीप बेलुडी वि.वि.नकुल फिरोदिया/संजय पाटील 6-0; खुला गट: राहुल कोठारी/अमित किंडो वि.वि.शौनक कासट/मनमीत लांबा 6-1; खुला गट: रवी कोठारी/नितीन सावंत वि.वि.अजिंक्य गारवे/महेंद्र देवकर 6-0);
 
टेनिस नट्स राफा वि.वि.सोलारिस गो गेटर्स 18-07(90अधिक गट: अतुल के/सुधीर पिसाळ वि.वि.आशिष कुबेर/आश्विन हळदणकर 6-1; खुला गट: दिपक पाटील/ऐश्वर्या इंगळे वि.वि. वसंत साठे/आनंद पी 6-4; खुला गट: सी कुमार/अशोक नायर वि.वि.महेंद्र जी/अमोल गायकवाड 6-2).

Leave a Reply

%d bloggers like this: