fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

स्लो दस्त नोंदणीमुळे नागरिक त्रस्त; रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

पुणे : गेल्या काही दिवसापासून नोंदणी विभागाचे सर्व्हर हे अत्यंत सावकाश व संतगतीने चालत आहे. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्वरित सर्व्हरची दुरुस्ती करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अन्यथा दस्त नोंदणी विभागा विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले, लाखों, करोडो रुपयांचे स्टॅम्प व नोंदणी फी भरून देखील ते चलन डिफेस न झाल्यामुळे नागरिकांना 40 मिनिटात पूर्ण होणारी नोंदणीसाठी तब्बल एक दिवस अथवा दोन दिवसाचा कालावधी जात आहे.आणि हे त्रास दायक आहे. चलनाद्वारे लाखो करोडचा स्टॅम्प भरून देखील ते चलन सिस्टीम स्वीकारण्यासाठी वेळ घेत असेल व नागरिकांचा अमूल्य वेळ वाया घालवत आहेत, हे कितपत योग्य आहे. अर्थात पैसे देऊन देखील फक्त मनस्तापला सामोरे जावे लागत आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल. नोंदणीच्या पावतीवर अद्याप दस्त सादर केल्यापासून फक्त 40 मिनिटात स्कॅन होईल अशी वेळ दिले जाते. सध्या स्कॅनिंग बंद या समस्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या वेळेचा आणि त्यांच्या भावनांचा विचार करून त्वरित सर्व्हर ची अडचण दूर करावी, असे रोहन सुरवसे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading