fbpx

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुणाल टिळक यांना भाजप कडून उमेदवारी ?

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची मागणी असली तरी कोंग्रेस कडून वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. भाजपने आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील उमेदवार दिला तरच निवडणूक बिनविरोध होईल अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांना भाजप कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात भाजपचा उमेदवार कोण असणार? याबाबद मोठी चर्चा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची इच्छा असली नाती अंधेरी आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने या निवडणुकीस उमेदवार उभा करण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भातील निर्णय महाविकास आघाडी घेणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या घरातील उमेदवार द्यायचा झाल्यास त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: