जी 20 साठी भाजपची प्रदेश समिती
पुणे : जी 20 परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे ‘प्रदेश संयोजक’ म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीचे पत्र दिले.
वसुधैव कुटुम्बकम् : ‘एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या G 20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळाले आहे. या विषयी जनजागृती करणे आणि लोकसहभागाची प्रदेश भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्याच्या आयोजनासाठी पांडे यांची प्रदेश संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार निरंजन डावखरे, शायना एन सी, खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ.अजित गोपछडे, प्रदीप पेशकर, श्वेता शालिनी, दयाशंकर तिवारी या सदस्यांचा समावेश आहे.
नवीन जबाबदारी स्वीकारताना आतापर्यंतच्या माझ्या ४० वर्षाच्या संघटन कौशल्याचा उपयोग करून राज्यभरात होणारे G-२० परिषदेचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नक्कीच शर्तीचे प्रयत्न करेल. G20 यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची मदत लागणार आहे. प्रत्येक भारतीयाने जी-२० च्या निमित्ताने राजकारण, पक्षभेद बाजूला ठेवून यात सहभागी व्हावे. उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर ही मोठ मोठी जबाबदारी सोपविली, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.
- राजेश पांडे, संघटन सरचिटणीस, भाजप, पुणे शहर
