fbpx

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित आंतर शालेय अभ्यास नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे : नाट्यसंस्कार कला अकामदी आयोजित आंतर शालेय अभ्यासनाट्य स्पर्धेत नवीन मराठी शाळा, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल आणि अभिजात एज्युकेशन सोसायटीने आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 12 शाळांमधील 25 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची अंतिम फेरी सुदर्शन रंगमंच येथे शुक्रवारी झाली. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पारितोषिक वितरण प्रसाद प्रकाशनच्या संचालिका उमा बोडस आणि लेखक-दिग्दर्शक प्रथमेश इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, अंतिम फेरीचे परिक्षक माधुरी ओक, अमोल जाधव व्यासपीठावर होते.
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा रमाकांत कुलकर्णी रुग्ण मित्र पुरस्कार विनोद केळकर यांना उमा बोडस यांच्या हस्ते या प्रसंगी प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


स्पर्धेचा सविस्तर निकाल :
इ. तिसरी-चौथी – बाल गट – प्रथम नवीन मराठी शाळा (संदेश वहन), द्वितीय प्रतिभा पवार शाळा (नैसर्गिक आपत्ती), तृतीय आर्यन वर्ल्ड स्कूल, मानाजीनगर (इंग्रजी व्याकरण), उत्तेजनार्थ दादा गुजर शाळा, हडपसर (धारकता). सर्वोत्कृष्ट लेखन प्रिया इंदूरलकर (संदेश वहन, नवीन मराठी शाळा). सर्वोकृष्ट दिग्दर्शन प्रिया इंदूरलकर (संदेशवहन, नवीन मराठी शाळा).

इ. पाचवी ते सातवी – – किशोर गट – प्रथम सिल्व्हर क्रेस्ट स्कूल (ट्रँगल्स), द्वितीय आर्यन वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी (हृदयाचे कार्य), तृतीय आर्यन वर्ल्ड स्कूल वारजे (वर्ग), उत्तेजनार्थ सिटी इंटरनॅशनल स्कूल (त्रिकोण). सर्वोकृष्ट लेखन संपदा क्षोत्री (हृदयाचे कार्य, आर्यन वर्ल्ड स्कूल). सर्वोकृष्ट दिग्दर्शन वृषाली गोगटे (ट्रँगल्स, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल).

इ. आठवी ते दहावी – कुमार गट – प्रथम अभिजात एज्युकेशन सोसायटी, कर्वेनगर (मूत्राशय), द्वितीय सिटी इंटरनॅशनल स्कूल (कॉम्प्यूटर), उत्तेजनार्थ सिटी इंटरनॅशनल स्कूल (बॅक्टेरिया). सर्वोकृष्ट लेखन येशिता पाटील (कॉम्प्यूटर, सिटी इंटरनॅशनल स्कूल). सर्वोकृष्ट दिग्दर्शन मानसी कुलकर्णी (मूत्राशय, अभिजात एज्युकेशन सोसायटी, कर्वेनगर).

अभ्यास नाट्य स्पर्धेतील एकांकिकांना प्रसाद प्रकाशनतर्फे प्रकाशित केल्या जातील असे उमा बोडस यांनी या प्रसंगी जाहीर केले. नाटक ही सांघिक प्रक्रिया असल्याचे प्रथमेश इनामदार म्हणाले. सुरुवातीस प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी तसेच अभ्यास नाट्य स्पर्धेच्या उपयुक्ततेविषयी माहिती दिली. कै.अपर्णा सोमण आणि कै.उद्धव सोमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेतील ट्रॉफी देण्यात आल्या. परिक्षकांच्या वतीने माधुरी ओक यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन क्षितिजा आगशे यांनी तर अंजली दफ्तरदार यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: