पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारला
पुणे:गूह विभागाने मंगळवारी राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी करण्यात आली. तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्थाच्या अपर पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज पदभार स्विकारला.
अतिशय शांतपणे काम करणारे रितेश कुमार हे 1991 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पहिले होते. मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काही काळ काम केले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात ते पोलीस महानिरीक्षक म्हणून यापूर्वी काम केले आहे. त्यानंतर पुण्यातील बिनतारी संदेश विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यात पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापुर्वी रितेश कुमार हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच सीआयडीचे प्रमुख होते. सीआयडीचे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी सीआयडी विभागात कर्तव्य बजाविले.