fbpx
Friday, April 26, 2024
BusinessLatest NewsNATIONAL

एअर इंडियाची मुंबई व सॅन फ्रांसिस्को दरम्यान आपली पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरु 

नवी दिल्ली भारतातील आघाडीची एअरलाईन आणि स्टार अलायन्समधील एक सदस्य, एअर इंडियाने १५ डिसेंबर २०२२ पासून मुंबई आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरु करून युनायटेड स्टेट्समध्ये आपले पंख अजून जास्त विस्तारले आहेत. २ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाने बंगलोर आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान आठवड्यातून तीनदा विमानसेवा सुरु केली होती, त्यानंतर लगेचच ही मुंबईहून सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.  जगाच्या नकाशावर जास्तीत जास्त सेवाविस्तार करण्याच्या आणि आपल्या ग्राहकांना उच्चतम दर्जाच्या सेवा व सुविधा पुरवण्याच्या एअर इंडियाच्या व्हिजनला अनुसरून ही नवी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवासाचे मुख्य केंद्र मुबई बनावे यासाठीचे प्रयत्न एअर इंडियाने सुरु ठेवले आहेत. मुंबई-सॅन फ्रांसिस्कोनंतर मुंबई-न्यूयॉर्क सिटी (जेएफके), मुंबई-फ्रँकफर्ट आणि मुंबई-पॅरिस हे रूट देखील सुरु केले जातील. मुंबईहून देशांतर्गत विमानसेवांची व्याप्ती व संख्या देखील वाढवली जाईल.

नव्याने भरती करून घेण्यात आलेल्या बोईंग ७७७-२००एलआर एअरक्राफ्टचा यामध्ये वापर केला जाईल आणि दर आठवड्याला मंगळवार, गुरुवार व शनिवार अशा तीन दिवशी मुंबई-सॅन फ्रांसिस्को विमानसेवा उपलब्ध असेल. सध्या एअर इंडियाच्या नॉन-स्टॉप विमानसेवा मुंबई ते नेवार्क, दिल्ली ते न्यूयॉर्क, नेवार्क, वॉशिंग्टन डीसी, सॅन फ्रांसिस्को आणि शिकागो, बंगलोर ते सॅन फ्रांसिस्को या मार्गांवर उपलब्ध आहेत. दिल्ली आणि बंगलोरनंतर मुंबई हे भारतातील तिसरे शहर आहे जिथून सॅन फ्रांसिस्कोसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

मुंबई ते सॅन फ्रांसिस्को या मार्गावरील पहिले विमान एआय १७९ मुंबईहून १४३० वाजता निघून त्याचदिवशी १७०० (स्थानिक वेळ) या सुविधाजनक वेळी सॅन फ्रांसिस्कोला पोहोचले. परतीचे विमान एआय१८० सॅन फ्रांसिस्कोहुन २१०० (स्थानिक वेळ) वाजता निघून मुंबईला ०३४० वाजता पोहोचेल + दोन दिवस.

माननीय केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. ज्योतिरादित्य एम सिंधिया आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे विमानसेवेच्या व्हर्च्युअल उदघाटन समारंभामध्ये उपस्थित होते. नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव श्री. राजीव बन्सल आणि एअर इंडियाचे फायनान्स चीफ श्री. विनोद हेजमाडी यांच्यासह त्यांनी या विमानाला हिरवा झेंडा दाखवला.

विमानसेवेचा शुभारंभ पवित्र दीपप्रज्वलनाने करण्यात आला, त्यानंतर केक कापण्यात आला, रिबन कापण्यात आली. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी श्री कॅम्पबेल विल्सन यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोर्डिंग गेटवर चेक इन करत असलेल्या पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास सुपूर्द केला. यावेळी एअर इंडिया, मुंबई विमानतळ आणि इतर कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रवासी उपस्थित होते. रिबन कापण्याच्या प्रसंगी विमानातील दोन सर्वात ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते.

माननीय केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी म्हणाले, “आज महाराष्ट्र, भारत आणि एअर इंडिया यांच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक दिन आहे. भारतामध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत आणि भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. गेल्या तीन वर्षात भारताने १०.६% सीएजीआरची वाढ नोंदवली आहे.  याआधी देखील एअर इंडियाने या क्षेत्रातील परिवर्तनामध्ये लक्षणीय भूमिका बजावली आहे आणि यापुढे देखील त्यांचे योगदान कायम राहील. एअर इंडियाचा वारसा, संस्कृती आणि व्हिजन यांच्यासह ही एअरलाईन भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाईल.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, “महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण एअर इंडियाने महाराष्ट्र व सॅन फ्रांसिस्को दरम्यानचे अंतर मिटवून टाकले आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर, महाराष्ट्रात अजून अनेक ठिकाणी अजून जास्त विमानतळे, हेलिपॅड्स उभारण्यावर सरकारचा भर आहे. मुंबईहून एअर इंडियाने सेवेचा शुभारंभ केला याचा मला अतिशय आनंद आहे.  इथून जगातील आणि देशातील इतर अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु केल्या जाण्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत.”

एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “विहान.एआय या आमच्या पंचवार्षिक परिवर्तन योजनेचा एक भाग म्हणून, भारतातील प्रमुख शहरे आणि जगभरातील प्रमुख डेस्टिनेशन्स यांच्यात कनेक्टिव्हिटी लक्षणीय प्रमाणात सुधारावी अशी आमची योजना आहे.  भारताची आर्थिक राजधानी आणि सिलिकॉन व्हॅली यांच्या दरम्यान नॉन-स्टॉप विमानसेवा हे ग्राहकांना सुधारित अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे.  हा मार्ग सुरु करण्यात आल्यामुळे आमच्याकडे दर आठवड्याला ४० नॉन-स्टॉप विमानसेवा उपलब्ध आहेत, ज्यामुळे यूएसएसोबत भारताच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होईल.”

मुंबई ते सॅन फ्रांसिस्को दरम्यानच्या पहिल्या विमानातील प्रवाशांना एअर इंडियाच्या वतीने विशेष तयार करण्यात आलेल्या गुडी बॅग्स स्वागतपर भेट म्हणून देण्यात आल्या.

अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.airindia.in याठिकाणी लॉग ऑन करावे किंवा आमच्या बुकिंग ऑफिसेसशी किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजंट्सशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading