फिनोलेक्स पाइप्स् तर्फे किसान अग्री शो मध्ये विविध प्रकारच्या शेती उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर
पुणे – फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. तर्फे किसान अॅग्री शो मध्ये प्लम्बिंग आणि सॅनिटेशन व शेती क्षेत्रासाठी पीव्हीसी- यू पाइप्सची अद्ययावत श्रेणी सादर केली जाणार आहे. किसान अॅग्री शो हे शेतकऱ्यांसाठी भारतातील सर्वात मोठे शेतीविषयक व्यासपीठ देणारे प्रदर्शन पुण्यात १४ ते १८ डिसेंबरदरम्यान भरले आहे. फिनोलेक्स पाइप्सद्वारे शेतीसाठी लागणाऱ्या पीव्हीसी- यू प्रेशर पाइप्स आणि फिटिंग्जची मोठी श्रेणी सादर केली जाणार असून ही उत्पादने शेती व जलसिंचनाशी संबंधित विविध प्रकारचा दाब आणि गुरुत्वाकर्षणाचा प्रवाह लक्षात घेऊन खास तयार करण्यात आली आहे.
पुणे किसान अॅग्री शो भारतीय शेती उद्योगासाठी एकच व्यासपीठ पुरवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शेती व्यावसायिक, निर्णयकर्ते, समविचारी व्यक्ती, सरकारी अधिकारी आणि भारताच्या सर्व भागांतील मीडिया एकत्र येऊन भारतीय शेती क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधतिल.
याप्रसंगी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित वेंकटरामन म्हणाले, ‘किसान अॅग्री शोमध्ये सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना अद्ययावत ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्याची संधी देण्यास मदत होईल. या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होणे हा आमच्या शेतकऱ्यांशी सातत्याने अर्थपूर्ण संवाद साधण्याच्या धोरणाचा एक भाग आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘या प्रदर्शनात मांडण्यात येणारी आमची शेती उत्पादने त्यांच्या विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध आहेत, कारण ती उत्पादनाच्या सर्व पातळ्यांवर कडक तपासण्यांतून तावून सुलाखून निघतात. त्यामुळे फिनोलेक्स अॅग्रीकल्चर पीव्हीसी पाइप्स शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक पसंतीची आहेत.’
फिनोलेक्सने मर्कंडाइज उत्पादनांची पुढील श्रेणी उपलब्ध केली आहे (उपविभाग)
(लिंक- www.finolexpipes.com/merchandise )
- वस्त्रप्रावरणे
- घर आणि ऑफिससाठी उपयुक्त वस्तू
- प्लम्बिंगसाठी लागणाऱ्या वस्तू
- बिझनेस चॅनेल सपोर्ट
