fbpx

दिव्यांगांचा सामुदायीक विवाहसोहळा उत्साहात संपन्न

पुणे ः दिव्यांग प्रतिष्ठान दिव्यांग सामुदायिक विवाह सोहळा संतगाडगेबाबा यांनी बांधलेल्या अकुल धर्मशाळा येथे मोठ्या उत्साहत पार पडला. या सोहळ्यात तब्बल 15 दिव्यांग जोडप्यांचे या प्रसंगी विवाह झाले.

या निमित्त दिव्यांग कल्याण आयुक्त संजय कदम, बार्टी च्या अतिरीक्त आयुक्त सुमिना भोसले, फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, जनसेवा बँकेचे संचालक व संत गाडगेबाबा यांचे अभ्यासक नंदकुमार राऊत, पुना हॉस्पिटलचे संचालक, पुरषोत्तम लोहिया, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे डॉ. राजेंद्र खेडेकर, मनिषा खेडेकर, लायन्स क्लब सहकारनगर, ललिता शिंदे, निलम खंडागळे, दिपक दोशी, व्यंकटेशश्वरा ग्रुपचे अनिल भस्मे, किरीट भैया पटेल, राजाराम देशमुख, डॉ. सुजित निळैगांवकर, नगरसेवक शितल शिंदे, अशोक पलांडे, प्रताप भोसले, प्रदिप खंदारे, राजू पटवर्धन, शंकरशेठ जगताप, संघचालक कसबा भाग अ‍ॅड. प्रशांत यादव, लायन क्लबचे चंद्रशेखर शेठ, प्रताप शिंदे, प्रकाश नारके, अजित मांजरेकर, शैला शेठ, आदिमान्यवर उपस्थित होते.

कसबा भागाचे संघचालक अ‍ॅड. प्रशांत यादव यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सोहळ्यास सुरुवात झाली. या वेळी सर्व वधू-वरांनी संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहु महाराज, क्रांतीगुरु लहूजी वस्ताद, आद्य सरसंघ चालक डॉ. हेडगेवार यांना अभिवान केले. गुडविल इंडिया , मुकुल माधव फाउंडेशन, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट तर्फे सर्व नवदांपत्यांना संसारउपयांगी वस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमास दिव्यांग, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, व्यवसायीक, क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन हरी सरडे, बाळासाहेब कांबळे, रवी ननावरे, डॉ. प्रसाद खंडागळे, डॉ. राजेंद्र खेडेकर, विकास माने, राजेश पवार, शरद शिंदे, संतोष वरक, योगेश खरात, जितेंद्र गाडे, रमेश पायगुडे, इत्यादी स्वयंसेवकांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: