fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महिला सुरक्षा ही प्राथमिक असली पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे

पुणे :महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गाड्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला.महिला सुरक्षा ही प्राथमिक असली पाहिजे.ही गोष्ट अतिशय धक्कादायक आहे.असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,निर्भया फंड प्रत्येक राज्यात येतो. भारतातील प्रत्येक नागरिक हा व्हीआयपीच आहे.गृहमंत्र्यांनी याची चौकशी केली पाहिजे. अद्याप याबाबत प्रतिक्रिया नाही, हे धक्कादायक आहे. हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत स्वत: स्पष्टीकरण द्यावं,’ अशी मागणी सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना मिळालेल्या जामिनाबाबतही सुप्रिया सुळेंनी
आनंद व्यक्त केला. मी कोर्टाचे आभार मानते, हा दिवस आनंदाचा आणि दिलासादायक आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.

Leave a Reply

%d