fbpx

गरवारे महाविद्यालयात अभाविप चे लोटांगण आंदोलन

पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डेक्कन नगराच्या वतीने आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये लोटांगण आंदोलन घेण्यात आले. एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयात एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्किल अँड डेव्हलपमेंट पार्ट – २ च्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण ५० पैकी भरणे अपेक्षित होते. पण महाविद्यालयाने ते २५ पैकी भरून विद्यापीठाला पाठवले. याचाच परिणाम असा की त्या विद्यार्थ्यांचा अंतिम सत्राचा निकाल अनुत्तीर्ण असा आला. सदर विषयात अभाविप च्या वतीने महाविद्यालय प्रशासनास वेळोवेळी सूचित करून देखील महाविद्यालय प्रशासनाकडून कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. याच विषयात अभाविप कडून महाविद्यालयाला साष्टांग नमस्कार घालून आंदोलन करण्यात आले. महाविद्यालय प्रशासनाकडून १९ डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. जर दिलेली ग्वाही जर महाविद्यालयाने पाळली नाही तर २० डिसेंम्बर ला प्रचार्यांच्या कक्षाला टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिला.
यावेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल, महानगर सह-मंत्री अमोल देशपांडे, हर्षवर्धन हरपुडे, कोथरूड भाग संयोजक शुभम रजपूत, डेक्कन नगर मंत्री आरोह कुलकर्णी, महाविद्यालय अध्यक्ष नवनाथ कावळे व अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: