Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते शाम जगताप यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी, : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या दिनदर्शिकेचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तानाजी जवळकर आदी उपस्थित होते.
दिनविशेष, पंचांग यांचा समावेश असलेल्या या दिनदर्शिकेचे पिंपळे गुरव परिसरातील 20 हजार नागरिकांना घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिनदर्शिका वाटप करण्यात येत असल्याबद्दल पिंपळे गुरव परिसरामधील रहिवास्यांकडून कौतुक केले जात आहे.
दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना अजित पवार यांनी सांगितले, की शाम जगताप यांनी काढलेली दिनदर्शिका आकर्षक असून, नागरिकांना दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडणारी आहे, अशा शब्दात कौतुक केले.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, की शाम जगताप युवा मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आले आहेत, हे स्तुत्य आहे. ही दिनदर्शिका घरातील सर्वांना उपयोगी पडणारी आहे.
शाम जगताप युवा मंचच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवून जनतेच्या हितासाठी आपण वचनबद्ध आहोत. 20 हजार नागरिकांना घरी जाऊन स्वतः दिनदर्शिका देण्याचा मानस शाम जगताप मित्र परिवाराने घेतलेला आहे, अशी माहिती शाम जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading