Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

मुलांच्या गटातून भैरवनाथ संघ भोसरी, प्रकाशतात्या बालवडकर, चेतक स्पोर्ट्स क्लब व श्रीकृष्ण स्पोर्ट्स उपांत्य फेरीत दाखल

खुला गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी

पुणे : स्पर्धेत मुलींच्या गटातून राजामाता जिजाऊ, राजा शिवछत्रपती, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन व स्पोर्ट्स अकादमी बारामती संघानी तर मुलांच्या गटातून भैरवनाथ संघ भोसरी, प्रकाशतात्या बालवडकर, चेतक स्पोर्ट्स क्लब व श्रीकृष्ण स्पोर्ट्स संघानी कै. प्रकाश (बापू) सणस यांच्या स्मरणार्थ, सरस्वती क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

नातूबाग येथे सुरु असलेल्या स्पर्धेतील मुलींच्या गटाच्याउपांत्यपूर्व फेरीत राजमाता जिजाऊ संघाने प्रकाशतात्या बालवडकर संघाला ४५-४३ असे केवळ २ गुणांच्या फरकाने पराभूत करतना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला प्रकाशतात्या बालवडकर संघाने २५-१९ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर राजमाता जिजाऊ संघाने आपला खेळ उंचावताना विजय साकारला. राजमाता जिजाऊ संघाकडून सायली केरीपाळे, अंकिता जगताप यांनी चढाया करताना संघाला गुण मिळवून दिले. सलोनी गजमल व प्रियांका मांगलेकर यांनी पकडी केल्या. पराभूत प्रकाश तात्या बालवडकर संघाकडून आम्रपाली गलांडे व अंकिता चव्हाण यांनी दमदार चढाया तर गौरी जाधवने पकडी केल्या. परंतू त्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

मुलींच्या गटातून दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत राजा शिवछत्रपती संघाने डॉ. पतंगराव कदम महिला कबड्डी संघाला ३७-२५ असे १२ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला राजा शिवछत्रपती संघाने २५-८ अशी आघाडी घेतली होती. बिजायी संघाकडून अंजली मुळे, सिद्धी मराठे व रिद्धी मराठे यांनी सुरेख कामगिरी बजावली. डॉ. पतंगराव कदम संघाकडून सानिका खाडे व वैभवी कंधारे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

मुलींच्या गटाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व लढतीमध्ये महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने द्रोणा स्पोर्ट्स क्लब संघाला ३०-२३ असे पराभूत करताना उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. मध्यंतराला महेशदादा स्पोर्ट्स संघाने १९-७ अशी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून माहेश्वरी वाघ, पूजा शेलार यांनी आक्रमक चढाया करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत द्रोणा संघाकडून श्वेता माने व आंचल पवार यांनी चांगली लढत दिली.

मुलींच्या गटाच्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत स्पोर्ट्स अकादमी बारामती संघाने एमएच स्पोर्ट्स संघाला ३२-३० असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला स्पोर्ट्स अकादमी बारामती संघाने २०-१८ अशी २ गुणाची आघाडी घेतली होती. हीच आघाडी स्पोर्ट्स अकादमी संघाने टिकवून ठेवताना विजय साकारला. विजयी संघाकडून साक्षी काळे, ऐश्वर्या झाडबुके यांनी चढाया करताना तर गौरी सावंतने पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून अपूर्वा मुरकुटे, शोभा खैरे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये श्रीकृष्ण संघाने वेताळेश्वर संघाला २९-२८ असे पराभूत करतना उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला वेताळेश्वर संघाने १४-८ अशी आघाडी घेतली होती. श्रीकृष्ण संघाकडून शुभम मुरकुटे, निखील मुरकुटे व मनोज पारखे यांनी दमदार चढाया तर वैभव महाजनने पकडी केल्या. पराभूत संघाकडून प्रतिक मांजरे, रोहित मांजरे व प्रथमेश मांजरे यांनी दमदार खेळी केली.

मुलांच्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रकाशतात्या बालवडकर संघाने राकेशभाऊ घुले संघाला ३३-२९ असे ४ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला राकेशभाऊ घुले संघाने १८-१२ अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर किरण गंगणे, बबलू गिरी व कल्पेश थोरवे यांच्या दमदार चढायांच्या जोरावर प्रकाशतात्या बालवडकर संघाने बाजी मारली. पराभूत संघाकडून गौरव तापकीर, अभिमन्यू गावडे, विशाल ताटे यांनी चांगली लढत दिली.

मुलांच्या गटाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या लढतीमध्ये चेतक स्पोर्ट्स संघाने भैरवनाथ सुस संघाला २३-२२ असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला भैरवनाथ सुस संघाने ९-८ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर चेतक स्पोर्ट्स संघाच्या स्वप्नील बालवडकर, अक्षय बोडके, राहुल वाघमारे यांनी आक्रकाम चढाया करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत भैरवनाथ सुस संघाकडून जितेंद्र शिंदे, आदम शेख, सनी पवार यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

मुलांच्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये भैरवनाथ संघ भोसरीने अभिजितदादा कदम संघाला ३७-३१ असे पराभूत करतना उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भैरवनाथ संघ भोसरीने १७-१३ अशी आघाडी घेतली होती. विजयी भैरवनाथ संघ भोसरी संघाकडून प्रथमेश फुगे, हर्षद माने व अजय वाढणे यांनी चढाया तर धीरज स्वामीने पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून सनत मांडगे, कुणाल पवार व ओंकार पाष्टे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

मुलींच्या उपांत्य फेरीत राजा शिवछत्रपती संघासमोर राजमाता स्पोर्ट्स संगाचे तर महेशदादा स्पोर्ट्स संघासमोर स्पोर्ट्स अकादमी बारामती संघाचे आव्हान असणार आहे. मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत भैरवनाथ संघ भोसरी व प्रकाशतात्या बालवडकर हे संघ तर चेतक स्पोर्ट्स क्लब व श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लब हे संघ आमनेसामने रहाणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading