fbpx

उत्तम केटरर्स संघाची विजेतेपदावर मोहोर

राज्यस्तरीय सॉफ्टबॉल लीग : महालक्ष्मी संघ उपविजेता

पुणे : गणेश भराटे व अक्षय मोंगल यांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर उत्तम केटरर्स संघाने महालक्ष्मी ग्रुप संघाला पराभूत करताना एएवाय’एस(आईज) सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय सॉफ्टबॉल लीग स्पर्धेच्या विजेतेपदावर आपली मोहोर लावली.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या आजच्या अंतिम लढतीत उत्तम केटरर्स संघाने महालक्ष्मी ग्रुप संघाला ९-५ असे ४ होमरन्सने पराभूत केले. अंतिम लढतीत उत्तम केटरर्स संघाकडून अक्षय मोंगलने २, गणेश भराटे, स्वप्नील गदादे, गौरव राजापुरे, शुभम काटकर,चैतन्य पवार, दानिश दलाल व संकेत पवळे यांनी प्रत्येकी १ होमरन केला. तर पराभूत महालक्ष्मी ग्रुप संघाकडून हरिओम त्रिपाठी, प्रीतेश पाटील, राज भिलारे, अभिजित सोनावणे व उमेध विसपुते यांनी प्रत्येकी एक होमरन करताना चांगली लढत दिली. मात्र ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये महालक्ष्मी ग्रुप संघाने जीबी इन्फ्रा संघाला ७-२ अशा ५ होमरन्सने पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महालक्ष्मी ग्रुप संघाकडून प्रीतेश पाटीलने २, हरिओम त्रिपाठी, राज भिलारे, कल्पेश कोल्हे, उमेध विसपुते, मोहित पाटील यांनी प्रत्येकी १ होमरन केला. पराभूत जीबी इन्फ्रा संघाकडून चेतन महाडिक व आदित्य म्हस्के यांनी प्रत्येकी एक होमरन केला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये उत्तम केटरर्स संघाने योहान पूनावाला संघाला १०-० असे एकतर्फी पराभूत करतना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उत्तम केटरर्स संघाकडून गणेश भराटेने २ तर शुभम काटकर, विनीत सपकाळ, स्वप्नील गदादे, अक्षय मोंगल, चैतन्य पवार, गौरव राजापुरे, दानिश दलाल, व विष्णू जाधव यांनी प्रत्येकी १ होमरन केला. योहान पूनावाला संघाला एकाही होमरन करता आला नाही.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोहोर व्हेंचर्सचे भरत देसडला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योहान पूनावाला फाउंडेशनचे नरेंद्र पाटील, जीबी इन्फ्राचे गणेश भोकरे, छत्रपती पुरस्कार विजेते दत्ता मोरे एएवाय’एस (आईज) सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे, सचिव राजेंद्र मिसाळ, आयकर अधिकारी नागेश पालकर, अनिरुद्ध शर्मा, योगेश जागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: