fbpx

शरद पवार यांचे कर्तृत्व खूप मोठे – अरुण फिरोदिया

पुणे :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षा पासून देशाचे सरंक्षण मंत्री अशी मोठी मजल पवारांची असून सत्तेत असो नसो तरी ते चर्चेत राहणारे व्यवितमत्व आहे , असे गौरवोद्गार प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले .

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजीत शरदोत्सवात आज   बालगंधर्व रंगमंदिरात संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त सत्कारार्थीं यांचा सत्कार फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते .
या सत्कारामध्ये कथ्थक नृत्यगुरू पं. नंदकिशोर कपोते,प्रसिद्ध सितार वादक उस्मान खाँ, प्रसिद्ध सतारमेकर मजिदभाई, प्रसिद्ध धृपद गायक पंडित उदय भवाळकर आणि प्रसिद्ध ढोलकी वादक पांडुरंग घोटकर या संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा आणि लावणी नृत्यांगना वैशाली जाधव यांचा
सत्कार करण्यात आला.
सत्कार
समारंभा नंतर ‘शरदाचे चांदणे’ हा मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम झाला. पार्श्वगायिका मनीषा निश्र्चल आणि इतर कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला.
यावेळी व्यासपीठावार संवाद पुणे चे सुनील महाजन , निकिता मोघे , पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते अंकुश काकडे , सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते .

फिरोदिया म्हणाले मी एफ.सी. महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन निवडणूक लढवित असतांना ते बीएमसीसी मधून ही निवडणुक नियंत्रीत करीत होते. माझ्या विरोधात उभे असलेल्या प्रतिनिधी मागे ते उभे असल्याने तोच निवडून येणार हे सर्वांनी गृहीत धरले आणि तसे झाले ही.

कथ्थक नृत्यगुरू पं. नंदकिशोर कपोते आणि लावणी नृत्यांगना वैशाली जाधव यांनी यावेळी प्रातेनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले .

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले तर प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: