Thursday, May 28, 2026
Latest NewsLIFESTYLE

मलाका स्पाइसने ने लॉन्च केला आपला विन्टर मेनू- बियॉन्ड रामेन

पुणे:  थंडीचे दिवस सुरू झाले आहेत व पुणेकर गरमागरम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आसुसलेले आहेत, म्हणुनच  मलाका    स्पाइस ने त्यांच्या हिवाळ्यास उबदार बनविण्यासाठी संपूर्ण आशियातील नूडल सूप प्रकारांचा समावेश असलेला एक नाविन मेनू तयार केला आहे. ज्याचे नाव आहे ” बियॉन्ड रामेन” .
या नवीन विन्टर मेनूचे उद्दिष्ट आहे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येणे आणि पुणेकरांना नव्या, अनोख्या व गरमागरम अश्या रामेन मेनूचा आस्वाद देने.
या विन्टर मेनू मध्ये आहे थायलंडमधील टॉम खा हेड ज्यात कोनबू दाशी आणि कोकनट मिल्क ग्रेवीचा वापर केला जातो.याचसोबत चासोबा नूडल्स ,असॉर्टेड मशरूम व विविध पर्याय, हाऊस चिकन सलामी , हाँगकाँग कार्ट नूडल सूप , स्पायसी किक देणारे डोबनजियांगच्या मसालेदार किकसह प्रोटिनयुक्त थिक उडोन नूडल्स देखील आहेत, याचसोबत टोफू किंवा ग्रील्ड फिश केकमधील एक पर्याय देखील निवडता येईल.
सोबतच चहा अंडी, ग्रील्ड क्वेल, स्लाइस्ड लँब आणि क्रॅब स्टिक्स असे अनेक पर्याय देखील येथे उपलब्ध आहेत. याची खास बाब म्हणजे संपूर्ण मेनू मध्ये ब्रॉथ स्टाईल बॅलन्स विविध प्रकारचे नूडल्स, क्रिमी सुप ते लाईट ब्रॉथ सोबत आउटलेट मध्ये बनवल्या जाणार्या विविध टॉपिंग्ज देखील आहेत जे की मलका टॅगलाईन- “इन्सापर्य्ड नॉट इमिटेटेड ” ला समर्पक आहे.
मेनूमध्ये थायलंड, चीन, जपान, तिबेट, मलेशिया आणि म्यानमार यांसारख्या विविध आशियाई आणि साऊथेस्ट आशियाई देशांमधील 7 प्रकारच्या सूप नूडल्सचा समावेश आहे. मलाका    स्पाइस कोरेगाव पार्क आणि खराडी येथे हा मेनू महिनाभरासाठी दिला जाईल. तर या खास क्युरेटेड नूडल सूप चा आस्वाद घेण्यासाठी पुण्यातील या आउटलेट्सला  नक्कीच   भेट द्या आणि पुण्यातील हा हिवाळा खास उबदार बनवा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading