fbpx

‘वेस्ट बंगाल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रामकुमार शेडगे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

रामकुमार शेडगे यांनी दिग्दर्शित केलेल्या तसेच द डार्क शॅडो मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या ‘द ट्रॅप’ वेब सिरीजला वेस्ट बंगाल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘लाईव्ह ऍक्शन’ कॅटेगरीमध्ये बेस्ट डायरेक्टर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या प्रसंगी बोलताना रामकुमार शेडगे म्हणाले की या पुरस्कासाठी माझी निवड केल्याबद्दल वेस्ट बंगाल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल व ज्यूरी चेअरपर्सन क्लारा हॉफमन व फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष योगेश बारस्कर यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

थरारक आणि रहस्यमय कथेवर आधारित ‘द ट्रॅप’ वेब सीरीज आहे. शहरातील नाईटलाईफची संस्कृती मोठ्या प्रमाणात तरुणांना आकर्षित करत असून त्यात तरुणाईचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. या नाईटलाईफमध्ये पबिंग, पार्टी करणे आणि मस्ती करणे हा तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. नाईटलाईफ संस्कृतीच्या चक्रव्युहात एक तरुणी कशी अडकते? हे या वेब सीरिजमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री जानकी आर, त्याचबरोबर रामकुमार शेडगे, आशुतोष भोसले, केतन पेंडसे, संदीप मोरे, अमोल भगत अशा अनेक कलाकारांचा अभिनय रसिकांना पाहायला मिळणार आहे. आकाश भापकर हे कॅमेरामन असून लेखक-दिग्दर्शक रामकुमार शेडगे आहेत. ही रोमांचकारी आणि रहस्यमय वेब सिरीज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: