fbpx

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍यांचा समाचार घेतलाच पाहिजे – डॉ. नीलम गोर्‍हे

मुंबई: भारतीय सैन्यांचे अनंत ऋण आहेत. ते कुणालाही विसरता येणार नाही. घरापासून दूर राहून देशसेवा करताना त्यांच्या आठवणी मनात काहूर माजवत असतात. सैन्याचे सर्वेसर्वा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण मानतो त्यांच्याबद्दल जर कोणी अपशब्द उच्चारत असेल त्याचा तिथला तिथेच समाचार घेतला पाहिजे, असे परखड मत भाजपा नेत्यांचा नामोल्लेख टाळत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोर्‍हे यांनी मांडले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच माज केंद्रिय मंत्री शरद पवार याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि पनवेल संघर्ष समितीने अंजूमन इस्लामच्या काळसेकर महाविद्यालयाच्या वातानुकुलित सभागृहात आयोजित केलेल्या भारतीय सैन्य, आदर्श प्राध्यापक, उत्कृष्ट मुख्याध्यापक आणि पनवेल अर्बन बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. नीलम गोर्‍हे बोलत होत्या.
व्यासपिठावर राज्याच्या माजी मंत्री आदिती तटकरे, कोकण पदवीधर मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील, उद्धव ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन पाटील, माजी आ. मनोहर भोईर, पनवेलचे प्रांताधिकारी रवींद्र मुंडके, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष सतिश पाटील, रायगड कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरदास गोवारी, सुदाम पाटील, पनवेल कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, ज्येष्ठ आर्युेवेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, शेकाप नेते गणेश कडू, काशिनाथ पाटील, सामाजिक कार्यकत्या डॉ. शैलजा केळकर, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रमुख भावना घाणेकर, शेकाप महिला आघाडीप्रमुख अनुराधा ठोकळ, कॉंग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्ष निर्मला म्हात्रे, कामगार नेत्या श्रृती म्हात्रे, शिवसेना महिला आघाडीप्रमुख कल्पना पाटील, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बी. एस. माळी, पनवेल तालुकाध्यक्ष पंकज भगत, सुधागडचे मुख्याध्यापक राजेंद्र पालवे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल कडू यांनी केले. तर माजी मंत्री आदितीताई यांनी अतिशय मौलिक विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी कर्नाळा नागरी सहकारी बँक ठेवीदारांनी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा नागरी सत्कार केला.

सैनिकांचे अवघड काम कोविडमुळे अधिक भावले!

कोविडच्या काळात इथे सुद्धा फार मोठे कोविड सेंटर उभारण्यात आले होते त्यावेळेला त्यावेळेला मी त्या अधिकार्‍यांशी बोलले होते त्यांना सूचना दिलेल्या आणि त्यांची अंमलबजावणी झाली होती, कांतीलालजींनी कोविडकाळाचा उल्लेख केला, एका बाजूला बैठका होत नाहीयेत, अधिवेशन थांबलेत. कागद आला तरी त्याला सॅनिटाइज केल्याशिवाय त्याला वापरणे, कारण त्यावेळी त्या कागदात किती जंतू आहेत अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे होतें तर अशा वेळेला ज्यावेळी कांतीलालजींनी मला संपर्क केला आणि त्यांनी काही प्रश्‍न माझ्याकडे मांडले. त्यावेळेला मला हेच जाणवले की सैनिकांचे कार्य किती अवघड आहे. प्रत्येक वेळेला घरापासून लांब राहून लढायचे आणि त्यातली आजची 71 सैनिक इथे आलेले आहेत त्यांच्या संदर्भात सांगायचे झाले तर आपल्या घरातील व्यक्ती जेव्हा काही काळासाठी जरी दूर जाते, त्या वेळेला त्यांची स्मृती किंवा त्यांची आठवण झाली नाही असे कधीच होत नाही. कारण आपल्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा बाहेर असते त्या वेळेला आपल्याला जी त्यांची जवळीक नसते ती आपण कधी वर्णनच करू शकत नाही, असे भावोद्गार डॉ. गोर्‍हे यांनी काढले.

कांतीलाल कडू एकटे नाहीत, त्यांच्यासोबत शिवसेना आहे!

आजची तुम्ही मला भेट दिली, ज्याच्यामध्ये मी माझ्या वडिलांना नमस्कार करते. त्याचा फोटो तुम्ही कुठून मिळवला, कसा मिळवला आणि तो तुम्ही मला भेट दिला आणि अशा वेळेला आपल्याला आपल्या घरच्यांची आठवण देवून आणि खरे सांगायचे तर तुम्ही एकटे नाही आहात. असे तुम्ही मानू नका. आम्ही तुमचे कुटुंबीय आहोत. आमच्या नावातच सेना आहे ना, शिवसैनिक म्हटल्यानंतर या सर्वांचा सन्मान करणे म्हणजे हेच काम आपले आहे आणि सन्मानाबरोबर एकमेकांची सुखदुःखात मदत केली पाहिजे, असे सांगत कांतीलाल कडू यांना डॉ. गोर्‍हे यांनी मोठा आधार दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: