fbpx

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांची‌ खास पोस्ट

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांना गौरवशाली राजकीय कारकिर्दीतील 55 वर्षांचा अनुभव आहे. यामुळे पवारांना महाराष्ट्रातील राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते.आज सत्ताधारी तसेच विरोधकांमधील अनेक नेते त्यांना राजकीय गुरु मानतात. यामुळे शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त राजकीय तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळातूनही शुभेच्छा दिल्या जात आहेत. यात त्यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही खास शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक स्पेशल ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! असं स्पेशल ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: