अरुण पवार व राजेंद्र जगताप यांच्या तर्फे हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथ व गो-शाळेसाठी धनादेश सुपूर्द
पिंपरी : पिंपळे गुरव येथील उद्योजक व मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वतीने पाचशे हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथासाठी लागणारा निधी ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांच्या शुभहस्ते उद्योजक संजय भिसे आणि ह.भ.प. धारुमामा बालवडकर यांच्याकडे देण्यात आला. तसेच श्री दत्त साई सेवा कुंज, कासारवाडी गोशाळेतील गायींच्या एक ट्रक चाऱ्यासाठी अरुण पवार यांच्या वतीने ह.भ.प. शिवानंद महाराज यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. बाळासाहेब काशिद (भंडारा डोंगर ट्रस्ट अध्यक्ष), ह.भ.प.श्री.संजय भिसे, भंडारा डोंगर ट्रस्टचे ह.भ.प. जगन्नाथ नाटक पाटील, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूआण्णा जगताप, उद्योजक माउली चेडे, ह.भ.प. तात्या जवळकर, उद्योजक संतोष लहाने, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सुतार, ह.भ.प. महादेव सुतार, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर सुतार, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव शिंदे आदी उपस्थित होते.
अरुण पवार यांनी सांगितले, की श्री ज्ञानेश्वरी हस्तलिखिताचा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर आता श्रीएकनाथी भागवत लिखाण करून घेण्याचा प्रयत्न आहे. रोज किमान ३६ ओव्या लिखाण करावे, असे १८ महिने (दीड वर्ष) केल्यास एकनाथी भागवत हा ग्रंथ लिखाण संकल्प पूर्ण होतो. त्यासाठी २ वह्या व १ ग्रंथ विनामूल्य देण्यात येणार आहे. लिखाणासाठी वह्या, ग्रंथ दिले जात आहेत, त्यासाठी हातभार म्हणून अर्थसहाय्य करण्यात आले. गोधन जपले पाहिजे या उद्देशाने कासारवाडीतील दत्त आश्रम येथील गोशाळेतील गायींना चाऱ्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही अर्थसहाय्य करण्यात आले, असेही अरुण पवार म्हणाले.