fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वारंवार असंच घडणार असेल तर महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही – अजित पवार


पुणे:चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या फुले-आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत.पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एकाने अचानक शाईफेक केली आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक घटना घडायला नको होती. मतभेद अन् विचारांची लढाई असू शकते. त्यासाठी निषेध व्यक्त करण्याची अनेक मार्ग आहेत. थोर पुरुषांबद्दल बोलताना राज्यकर्त्यांनी देखील भान ठेवणे गरजेचे आहे. वारंवार असंच घडणार असेल तर महाराष्ट्रातील जनता काय आम्हीही खपवून घेणार नाही. असे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
राज्यपालांवरील कारवाई व अन्य विषयासंदर्भात आघाडीचा १७ डिसेंबर रोजी मोर्चा तर पुण्यात १३ डिसेंबर रोजी बंद पुकारलेला आहे असेही पवार यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पार पडलं. नागपूर ते शिर्डी हा टप्पा आता सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे.अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.समृद्धीचं श्रेय घेण्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्पर्धा असेल असं मला काही वाटत नाही”, असं ते म्हणालेत. कारण दोघांनी एकत्रच पंतप्रधानांना आमंत्रण दिलं. दोघांनी एकत्रच रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी ड्रायव्हिंगचं काम देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं होतं.असा टोला लगावला आहे.
अजित पवार म्हणाले,मलाही कधीकधी प्रश्न पडतो की मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग १००, दुसऱ्या कुठल्या रस्त्यावर गाडीचा वेग ८० आणि समृद्धी महामार्गावर गाडीचा वेग १५०. एवढी तफावत आहे.असे अजित पवार म्हणाले.
कर्नाटक सीमा प्रश्नावरून पेटलेले रान भिजवण्याचे काम थेट आता पंतप्रधानांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत केले जाणार आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांनी शिकवलेल्या गनिमी काव्याचा वापर करावा अन् महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्यावे की, आपण कुठेच कमी पडू शकत नाही. बैठकीत सीएम की डीसीएम बाजू मांडतील त्यांनी आपण कसे योग्य आहोत हे दाखवून देत हक्क मिळवून द्यावा असेही त्यांनी सांगितले.
मंत्री 20 असले तरी चाळीस मंत्र्यांच्या नावे बंगले बुक करण्यामागचे गुपित म्हणजे याच काळात मंत्रिमंडळ विस्तार प्लॅन असू शकतो अशीही शंका पवार यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे नीती आयोगासारखे पद निर्मिती महाराष्ट्रात करण्यात आली असून त्याजागेवर एका बिल्डरची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच बिल्डर विषयी मागेच आशिष शेलार यांनी आक्षेप घेतलेला असताना सीएम डीसीएम काहीतरी चाललंय अस दिसते, या प्रश्नावर बोलताना पवार यांनी गुगली टाकत सांगितले की, ‘ त्या दोघांचं ते चाललंय त्या दोघांना लखलख लाभ ‘ अस म्हणत त्यांनी काढता पाय घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: