fbpx

फर्ग्युसनमध्ये भारतीय भाषा दिन साजरा

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिन’ साजरा करण्यात आला. लेखिका आणि अनुवादक लीना सोहनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

अभ्यासासाठी कुठलीही भाषा वर्ज्य नाही. विविध भाषांमधून सामाजिक सलोखा निर्माण होतो. सततच्या लेखन आणि वाचनाच्या व्यासंगातून आपण उत्तम अनुवादक होऊ शकतो. चांगल्या अनुवादकाकडे अहंकार किंवा मी पणाचा लवलेश नसतो. तरच तो मूळ लेखकाचे विचार वाचकाकडे योग्यप्रकारे पोहचवू शकतो, असे मत सोहोनी यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, तमिळ मल्याळम, कानडी अशा भारतातील विविध भाषांमध्ये घोषवाक्य तयार करून सर्वांना एकतेचा संदेश दिला.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. नारायण कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रबंधक, डॉ. सविता केळकर, हिंदी विभागातील शिक्षिका सुनीता जमदाडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. डॉ. सविता केळकर यांनी सूत्रसंचाल आणि जगदीश पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: