चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकी विरोधात भाजपचे आंदोलन
पुणे : भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमादरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काल चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यात भाजप तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगदीश मुळीक म्हणाले, काल चंद्रकांत पाटील यांच्यावर ज्या गुन्हेगारांनी शाई फेक हल्ला केला तो एकदम चुकीचा आहे. त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या घटनेवर महाविकास आघाडी मधील एकाही नेत्याने आपले मत मांडलेले नाही. आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. जर त्या हल्लेखोरांना कडक शिक्षा झाली नाही तर. आम्ही येथे पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन करू अशे जगदीश मुळीक म्हणाले.