Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पुणे बंदला पाठिंबा

पुणे : आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांच्या वतीने मंगळवारी (१३ डिसेंबर) पुणे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे बंद संदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पुणे बंद कृती समितीच्या सदस्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे बंदला पाठिंबा दिला आहे.

सदर बैठकीस पक्षाचे पुणे शहर , पिंपरी चिंचवड़ व पुणे जिल्हयातील सर्व आमदार ,नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. सदर बंदमध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून हा बंद शांततापूर्ण मार्गाने आणि लोकशाही मार्गाने पार पडावा, अशी अपेक्षा ही सर्व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading