fbpx

शासनाने मराठी भाषा भवनाची उभरणी करावी यासाठी एकीकरण समितीचे ‘भीक द्या’ आंदोलन

पुणे : आज पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावर मराठी एकीकरण समितीतर्फे ‘भीक द्या’ आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात इतर भाषेची तसेच राज्यांच्या नावाने भवन निर्माण होत असताना मराठी भाषा भवनच नाही. यासाठी शासनाकडे निधी नसावा म्हणून मराठी एकीकरण समिती तर्फे या भीकेतुन मिळालेला पैसा शासनाला देऊन मराठी भाषा भवन उभरणी करावी, हि विनंती करण्यात येणार आहे. त्यासाठीआज पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावर मराठी एकीकरण समिती तर्फे भीक द्या आंदोलन करण्यात आले.

शहरात विविध भागतही याच पद्धतीने कार्यक्रम करुन शासन दरबारी निधी देण्यात येणार आहे, याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष रवींद्र नामदेव कळमकर यांनी माहिती दिली. यावेळी दिग्विजय पाटील स्वप्निल जाधव, राज जाधव,राजन पंदारे, संदेश डुंबरे,अमोल सोयम,विक्रम पाटील,सुनील तोडकर तसेच इतर शिलेदार उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: