fbpx

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईहल्ल्या प्रकरणी 10 पोलिस निलंबीत  

पुणे : भाजप नेते व पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईहल्ल्या प्रकरणी पिंपरी चिचवड पोलिसांनी 10 पोलिसांना निलंबीत केले आहे. यामध्ये तीन अधिकारी व सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईहल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर 307 कलम लावण्यात आले आहे.  दरम्यान, या शाईहल्ल्यात अटक करण्यात आलेल्या तिघांची ओळख पटली आहे. हे हल्लेखोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल या संघटनेचे आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे सदस्य आहेत. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: