पीएनबी हाऊसिंग फायनान्सने टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये परवडणाऱ्या गृहकर्जांमध्ये आपली पोहोच वाढवली
पुणे: प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीचे घर घेण्याच्या स्वप्नाला सक्षम करत पाठिंबा देण्याच्या पीएनबी हाऊसिंग फायनान्सच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला अनुसरून कंपनीने नुकतीच रोशनी ही परवडणारी गृहकर्ज योजना सादर केली. या उपक्रमांतर्गत व्यक्ती ५ लाख रुपयांपासून ३० लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकतात.
देशात ही योजना सुरू करताना आज कंपनीने चेन्नई, कोईम्बतूर, गाझियाबाद, हैदराबाद, इंदूर/उज्जैन, लखनौ, मुंबई, नागपूर, पुणे, राजकोट आणि वाराणसी येथे रोशनी–केंद्रित शाखा स्थानांचे उद्घाटन केले.
ही योजना घराच्या मालमत्तेची खरेदी, स्व–बांधकाम, घराचा विस्तार/नूतनीकरण, प्लॉट खरेदी आणि बांधकाम, मालमत्तेवर कर्ज इत्यादीसाठी विविध प्रकारचे कर्ज देते. त्यामुळे क्रेडिटसाठी नवीन असलेले कर्ज अर्जदार, औपचारिक उत्पन्नाशिवाय स्वयंरोजगार करणारे, अगदी १०,००० रुपये कमी घरगुती उत्पन्न असलेले अल्प उत्पन्न गटातील ते मध्यम उत्पन्न गट श्रेणी पर्यंत सर्वांचा विचार केला जाईल.
पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कौसगी म्हणाले, “रोशनीसह, आम्ही आमचा परवडणाऱ्या घरांच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ करत आहोत. पीएनबी हाऊसिंग फायनान्समध्ये आम्ही ग्राहकांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे, आम्ही देशभरात टियर २ आणि ३ शहरांमध्ये संभाव्य घरमालकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे स्थान निर्माण करण्यावर भर देत आहोत. रोशनीच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे‘ उपक्रमाप्रती आमच्या वचनबद्धतेचे पुनरावलोकन केले आहे आणि बांधकाम व्यवसाय उद्योगातील वाढीला चालना देण्यासाठी आम्ही चांगल्या स्थितीत आहोत.
उद्योगक्षेत्रातील ३० हून अधिक वर्षांचा अनुभव आणि ग्राहकांचा विश्वास, संपूर्ण भारतातील शाखा नेटवर्क आणि एक मजबूत सेवा वितरण मॉडेल यांसह पीएनबी हाउसिंग फायनान्स देशभरातील गृहकर्ज शोधणाऱ्यांना सेवा देत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्ली–एनसीआरसह १५ राज्यांमध्ये पीएनबी हाउसिंग फायनान्सचा विकास करण्याचा मानस आहे.