fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNE

बार्टी व MCED च्या वतीने अनुसूचित जातीतील पात्र उमेदवारांसाठी नव्या पिढीचे उद्योजक आणि स्टार्ट अप उपक्रम

पुणे -डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी इंक्युबेशन फॉर न्यू जनरेशन अंत्रप्रेन्यूअर्स अँड स्टार्ट-अपस् उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या उपक्रमामध्ये निवासी / अनिवासी उद्योजकता, तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा डोमेन / सेक्टर स्पेसिफिक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येत आहे. आय टी आय उत्तीर्ण, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेल्या अथवा शिक्षण घेत असलेल्या फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करता येईल.
प्रवेश अर्ज आणि आवश्यक कागदपत्र जोडलेल्या पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखत घेण्यात येणार आहे.
४० अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मुख्य उपक्रमासाठी निवडण्यात येणार आहे. प्राधान्यक्रमाने पुणे विभागातील (पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्हे) तसेच नाशिक विभागातील (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हे) आणि त्यानंतर मुंबई / कोंकण विभागातील (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हे) अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करता येईल. अपवादात्मक परिस्थितीत विदर्भ आणि मराठवाडा विभागातील नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल. शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटीनुसार अर्जासोबत कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र उमेदवारांची सर्व कागदपत्र – शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, २ अद्यावत फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी शशिकांत कुंभार प्रेरक प्रशिक्षक तथा वरिष्ठ प्रकल्प अधिकारी (९४०३०७८७५२) आणि  सुदाम थोटे विभागीय अधिकारी (९४०३०७८७५३) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) कृषी महाविद्यालय परिसर, म्हसोबा गेट जवळ, गणेश खिंड मार्ग, शिवाजीनगर, पुणे – ४११ ००५ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: