Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

स्वयँप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ७५ टन धान्यवाटपातून दान उत्सव

पुणे : स्वयँप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महाराष्ट्रातील ६२ संस्थांना मिळून ७५ टन गहू धान्यवाटप करुन दान उत्सव साजरा करण्यात आला. समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये अनाथाश्रम, ग्रामीण विकास करणा-या संस्था, वृद्धाश्रम, दृष्टीहिन मुलांना स्वत:च्या पायावर उभ्या करणाºया संस्था, गतिमंद मुलांना सांभाळणा-या संस्था, गायींचे संगोपन करणाºया संस्था, वनवासी भागात काम करणा-या अनेक संस्थांमध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. उपक्रमाचे यंदा ७ वे वर्ष होते.

ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. सुनील शशिकांत काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा दान उत्सव दरवर्षी केला जातो. यावर्षी पुण्यासह, बारामती, मुळशी, बीड, नळदुर्ग, सोलापूर, तळेगाव, नारायणपूर, अमरावती, उस्मानाबाद, अहमदनगर, वाघोली, राजगुरुनगर, पंढरपूर, आळंदी, वडगाव, पुरंदर, चाकण, जुन्नर, सातारा, जळगाव, जामखेड या भागांतील सामाजिक संस्थांना धान्य देण्यात आले आहे.

व्यवसायाने डॉक्टर असेलेले सुनील काळे, मागील १४ वर्ष समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना सहज समजेल अशा भाषेत प्रबोधन करीत आहेत. आयुष्यात असलेला अज्ञानरुपी अंध:कार केवळ ज्ञानरुपी प्रकाशामुळेच दूर होऊ शकतो आणि माणसाला आयुष्याचा धागा गवसतो. या उद््देशाने वेदांपासून चालत आलेले, आपल्या संस्कृतीत सांगितलेले ज्ञान विज्ञानाशी कसे सुसंगत आहे, आयुष्याकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन देणारे तसेच आयुष्य कसे जगावे, हे अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालत समाज प्रबोधन करत आहेत. संगीताच्या माध्यमातून परमतत्वाची उकल अगदी सोप्या भाषेत ते करतात. मुंबई, पुणे, बदलापूर, सांगली, कोल्हापूर, कराड, रत्नागिरी, नाशिक, अमरावती, लातूर, जळगांव अशा अनेक ठिकाणी त्यांची ९०० हून अधिक विवेचने संपन्न झाली आहेत.

‘ हे विश्वम्भरा, समस्त विश्वाचे कल्याण कर ! ‘ अशी प्रार्थना आपण परमेश्वराकडे करतो. समाजासाठी मदत करायची असे मनापासून ठरवलं तर हा जनता जनार्दन हिमालयासारखा पाठीशी खंबीर उभा राहतो, असं डॉक्टरांचं म्हणणे आज सत्यात उतरलेले बघायला मिळते. आपल्यावर समाजाचे अनंत ऋण आहे आणि म्हणूनच आपल्याला जेवढे शक्य आहे. तेवढी गरजू लोकांना मदत करावी आणि अनेक हात जर एकत्र आले तर हा डोंगर सहज एका करंगळीवर उचलता येऊ शकतो यावर ठाम विश्वास आहे, असे मत गहूदान उपक्रमाच्या निमित्ताने डॉ. सुनील काळे यांनी व्यक्त केले. याच विचारधारेतून २०१२ साली स्वयंप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या अंतर्गत धान्यदान, वस्त्रदान, दुग्धदान, ज्ञानदान असे अनेक उपक्रम राबवले जातात.

समाजासाठी अनेक संस्था प्रामाणिकपणे, निरपेक्षपणे खूप मोलाचं कार्य करत आहेत, त्यांना जरी आपण त्यांच्या कार्यात मदत करू शकलो आणि त्यांनी ती स्वीकारली तरी त्यांच्या महान कार्यासाठी आपला खारीचा वाटा, अशा उद्देशाने समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत गरजू लोकांना खंबीर आधार आणि बळ देणाऱ्या संस्थांशी संपर्क साधून दर वर्षी अन्नदान करण्याचा त्यांचा मानस आणि त्याला जनता जनार्दनाकडून आणि संस्थांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद म्हणूनच हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवता आला ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading