fbpx

14 व्या विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनात सादर होणार ‘गोधडी’

 

सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्धचा विद्रोह आहे मंजुल भारद्वाज यांचे गोधडी हे मराठी नाटक !

भारताने अहिंसेच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान मिळवला आणि जगाला शांततेचा मार्ग दाखवला. सर्वोत्कृष्ट संविधानाने समता, समानतेच्या मूलभूत मानवी
हक्कांसह आपल्या नागरिकांना देशाचे मालक बनवले आणि जगाला साम्यवादाचे सर्वात मोठे सूत्र दिले.

तरीही 70 वर्षांनंतर भारतातील लोकशाही ही झुंडशाही बनली आहे. विकारी सत्तेने अहिंसेची तिलांजली देऊन हिंसेला आपले शस्त्र बनवले. सामाजिक सहृदयता नष्ट केली. भारताचे वातावरण आज भीती आणि द्वेषाचे आहे. संस्कृती आणि संस्कारांची हमी देऊन विकारी संघाने सत्ता मिळवली आहे. संस्कृती आणि संस्कारांच्या नावाखाली समाजाला हिंसक, क्रूर आणि धर्मांध बनवले.
आपली संस्कृती काय आहे? आपण कधी विचार करतो का? संस्कृतीच्या नावाने हिंसा दर्शविणारे सण आणि अवडंबर आपल्यासमोर दाखविले जातात. युद्ध, युद्ध, युद्ध, हिंसा विकाराला पुजणे ही आपली संस्कृती आहे का?

हो, संस्कृती, अस्मिता आणि धर्माचे रक्षक असल्याचा दांभिकपणा मिरवणाऱ्या विकारी संघाचे मूळ आहे हिंसा. याचे मूळ आहे वर्णवाद! वर्णवाद ही भारताची संस्कृती आहे जी शोषण, असमानता, अन्याय आणि हिंसेने चालते.

वर्णवाद इतका विषारी आहे की तो माणसाला माणूस मानत नाही. पशुला माता म्हणून पूजतो आणि माणसाला अस्पृश्य मानतो. वर्णवाद वर्चस्वादातून आत्मग्रासित अपसंस्कृतीला जन्माला घालते जी मानवतेच्या नावावर कलंक आहे.

गाव भारताचा आत्मा आहे. या भारताच्या आत्म्याला वर्णवादाची वाळवी लागली आहे. संपूर्ण गाव वर्णव्यवस्थेला पूजते. कधीतरी गावाला निरखून बघा, तुम्हाला जातीयवादाच्या शोषणाची चित्कार ऐकू येईल. 70 वर्षात संविधान संमत भारताच्या स्वप्नाला साकार होऊ दिले नाही या वर्णवादाने.

संविधान संमत भारत बनवण्यासाठी भारतातील खेड्यापाड्यातून वर्णवादाचे उच्चाटन करणे अनिवार्य आहे. गोधडी हे नाटक वर्णवादी संस्कृती विरुद्धचा विद्रोह आहे. गोधडी हे नाटक भारतातील गावांना वर्णवादापासून मुक्त करण्याचा प्रण आहे. नाटक गोधडी हे समतेची गाज आहे,मानवी ऊब आहे. हिंसेविरुद्ध अहिंसेचा आलोक आहे.नाटक गोधडी भारतीय संस्कृतीचा आत्मशोध आहे!

Leave a Reply

%d bloggers like this: