fbpx

बोगस ११२ दस्त नोंदणीची कारवाई करून गुन्हा दाखल करा


प्रदेश युवक काँग्रसचे सरचिटणीस रोहन पाटील यांची मागणी

पुणे,:महसूलमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हवेली क्र.१ ते २७ मध्ये बोगस एन.ए. ऑर्डर लावून दस्त नोंदणी सुरू आहे. बोगस ११२ दस्तनोंदणी प्रकरणाची कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आयजीआर कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
सुरवसे पाटील म्हणाले की, मार्च २०२२ मध्ये पुणे शहरातील बोगस एन.ए. ऑर्डरचे घोटाळे बाहेर काढले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुणे दौऱ्यावर असताना बोगस एन. ए. ऑर्डरच्या संदर्भात दोषी असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच गुन्हे दाखल न झाल्यास आयजीआर, डीआयजी, जेडीआर यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असे सांगितले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: