fbpx

मनसेने कर्नाटकच्या बसला फासले काळे

पुणे: महाराष्ट्रआणि कर्नाटक राज्यांत सीमावाद पेटला असून बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात कर्नाटक सरकार विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे.नवले ब्रीज येथे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून त्यांनी कर्नाटक सरकाराच्या गाड्या अडवून त्यावर काळे फासून, त्यावर जय महाराष्ट्र, जय मनसे लिहून निषेध नोंदविला.मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे सातारा महामार्गवरील स्वामी नारायण मंदिराजवळ कर्नाटकच्या बस अडवून, त्यावर काळे फासण्यात आले असून जय महाराष्ट्र, जय मनसे असे लिहून निषेध नोंदविण्यात आला.या आंदोलन प्रकरणी मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, विक्रांत अमराळे,युवराज लांडगे, सचिन काटकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: