fbpx

मेघराज राजेभोसले मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य कलाकार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद


पुणे : मेघराज राजेभोसले मित्र परिवाराच्या वतीने भव्य कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्यात पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक,औरंगाबाद, जालना, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी शहरांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेकडो कलाकारांनी सहभागी होत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य मेळाव्याचे आयोजन नारायणी लॉन्स, डी पी रोड कर्वे नगर येथे करण्यात आले होते. या मेळाव्यास चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंत, तंत्रज्ञ, कामगार व विविध सेवा पुरवठादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवोदित कलाकारांच्या समस्या जाणून घेणे, चित्रपट क्षेत्रातील लोकांची एकमेकांशी संवाद व्हावा, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.यंदा या मेळाव्यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुरेश विश्वकर्मा, पूजा पवार, संदीप पाठक, सुनील गोडबोले, रमेश परदेशी, अनिल नगरकर, शिवराज वाळवेकर, जयमाला इनामदार, मिलिंद लेले, डॉ. सुधीर निकम, लक्ष्मीकांत खाबिया, राज काझी, बाबा पाटील, दिलीप दळवी, राजेश दामले यांच्यासह अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, सचिन इटकर, गजानन थरकुडे, बाळासाहेब दाभेकर, ऍड मंदार जोशी, मिलिंद पवार, हर्षल पाटील, दीपक पोटे, विजय टापरे, डॉ. अजितसिंह पाटील, गणेश खुडे(जनता डेव्हलपर्स),निर्माता संतोष चव्हाण, इम्रान शेख, प्रवीण वानखेडे, पूजा जालंधर, अभिषेक भारद्वाज, सुनीता मोडक आदी दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: