fbpx

‘शांता शेळके स्मृती पुरस्कार’ गुरू ठाकूर यांना जाहीर

पुणे : मराठी गीतकार, पटकथा – संवादलेखक, नाटककार, चित्रपट-अभिनेता असे बहुगुणी व्यक्तिमत्त्व असलेले गुरू ठाकूर यांना यंदाचा शांता शेळके स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती मा.आमदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी दिली.

त्या म्हणाल्या की साहित्य शारदा ‘शांताबाई शेळके’ यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता “आठवणीतील शांताबाई” या सांस्कृतिक कार्यक्रमाने करत आहोत. ज्येष्ठ कवी, गीतकार गुरू ठाकूर यांना या वर्षीचा ‘शांता शेळके स्मृती पुरस्कार’, मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभिषण चवरे, म. सा. प. चे कार्याध्यक्ष डॉ . मिलिंद जोशी, प्रविण दवणे हे ही उपस्थित राहणार आहेत. रविवार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, कोथरूड येथे आयोजित केला आहे. सदरील कार्यक्रम पुणेकरांसाठी विनामूल्य असून जास्तीतजास्त पुणेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजक मा. आमदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: