fbpx

कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी हिरकणी पुरस्काराने सन्मान

 

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत उद्योग विश्वात गरुड झेप घेणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा उद्योग आणि हिरकणी पुरस्कार देऊन नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला. पल्लवी वागस्कर यांनी महिलांसाठी सुरू केलेला उद्योगिनी समूहचा उद्योगिनी हिरकणी सन्मान महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

या सोहळ्याला जगातील पहिल्या महिलेने एव्हरेस्ट सर केला त्या अपर्णा प्रभु देसाई, गोपाळ जयसिंग शिंदे (आर्मी ऑफिसर), उद्योजक मनीष घुले, डॉ. इशा नानल, डॉ. अरुंधती पवार, उद्योजिका शितल अमराळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह मेडल, ट्रॉफी असे होते. यावेळी समाजात उल्लेखनीय कामगिरी करून स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या ६ हिरकणी माधुरी देसाई, तेजल दुधाने, ए.पी.आय मनीषा टूले ,अभिनेत्री पुष्पा चौधरी, गायिका वृषाली महाजन, व सीमा सुतार यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

व तसेच उदयोन्मुख उद्योजिका गायत्री भालेराव, तृप्ती होशिंग, अन्नपूर्णा जगताप ,गायत्री हरीश ,रेश्मा रायगुडे, देवल मेहता, उज्वला भोसले ,पूजा रोकडे ,किशोरी सांगळे ,वैजयंती दंडनाईक, दिपाली सुरवसे ,निर्मला नलावडे ,उज्वला नायक ,पौर्णिमा सारस्वत, व ऑनबोर्ड ट्रेनिंग सोल्युशन्स यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित केले गेले.

या प्रसंगी अपर्णा देसाई म्हणाल्या की आज  उल्लेखनीय कामगिरी केलेल्या निवडक २१ महिलांना हिरकणी हा पुरस्कार माझ्या हस्ते देताना मला अभिमान वाटतोय. उद्योग क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग कौतुकास्पद आहे. नवरात्रीच्या प्रसंगी आदिशक्तीचे रूप असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान म्हणजे संपूर्ण स्त्री वर्गाला प्रेरणा देणार आहे.
उद्योगिनी समूह हा संपूर्ण देशात तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा या ठिकाणी  कार्यरत आहे. यामध्ये २५ हजार महिलांचा समावेश आहे. यामध्ये महिलांना व्यवसाविषयी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कदम यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: